नवी दिल्ली - घरांच्या किमतीत वाढ होण्याच्या बाबतीत जागतिक स्तरावर पहिल्या ४४ शहरांमध्ये मुंबई तिसऱ्या आणि दिल्ली पाचव्या क्रमांकावर आली आहे. गेल्यावर्षी जानेवारी-मार्चदरम्यान किमती वाढीबाबत मुंबई सहाव्या तर दिल्ली १७व्या क्रमांकावर होती. रिअल इस्टेट सल्लागार कंपनी नाइट फ्रँकच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.मनिला ही फिलिपाईन्स देशाची राजधानी घरांच्या किमतीत वाढ होण्यामध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे. येथे घरांच्या किमतीत २६.२ टक्के वाढ झाली आहे. त्याखालोखाल टोकियो १२.५ टक्के वार्षिक वाढीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.अहवालानुसार, मार्च तिमाहीत मुंबईतील प्रमुख निवासी भागातील घरांच्या किमतीत वार्षिक ११.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत बंगळुरूच्या क्रमवारीत घसरण झाली असून, किंमत वाढीत ते १७ व्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत बंगळूरू १६ व्या स्थानावर होते.
देशात कोणत्या राज्यांत घरांच्या किमतीत वाढ?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 6:03 AM