इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची तारीख जवळ येत आहे. एप्रिल महिन्यापासून इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. या दरम्यान अनेक टॅक्स पेयर्स २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीसुद्धा टॅक्स दाखल करू शकतील. तसेच या आर्थिक वर्षासाठी करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर सूटही मिळवू शकतील. मात्र एक आवश्यक बाब लोकांना मार्च महिन्यामध्ये करावी लागेल. तेव्हाच त्याच्या फायदा त्यांना इन्कम टॅक्स दाखल करताना मिळू शकेल.
टॅक्स पेअर्सनी पुढील आर्थिक वर्षासाठी गुंतवणुकीची योजना आखण्यास सुरुवात केली आहे. कारण चालू आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२३ रोजी संपुष्टात येईल. भविष्यातील टॅक्सचं नियोजन महत्त्वाचं आहे. मात्र या महिन्याच्या अखेरीस काही थे प्रक्रियांना सुनिश्चित केल्याने टॅक्स वाचवण्यात मदत होईल.
२०२२-२३ हे आर्थिक वर्ष अखेरच्या टप्प्यात असताना टॅक्सपेयर्सकडे टॅक्स कपातीचा लाभ घेण्याचा अवधी संपुष्टात येत चालला आहे. गुंतवणूक करण्यासारख्या काही सोप्या मार्गांचं पालन करून खूप मोठ्या प्रमाणावर कर वाचवू शकतात. या संधीचा लाभ घेण्यासाठी वेळेच्या आधी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
जर तुम्हाल इन्कम टॅक्स दाखल करताना टॅक्सच्या सवलतीचा फायदा उचलायचा असेल तर तुम्हाला ३१ मार्च २०२३च्या आधी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. ती गुंतवणूक इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करताना दाखवता येईल. तसेच त्यावरील करही वाचवता येईल. अशा परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला एक स्कीम सांगणार आहोत, तिचा वापर करून तुम्हाला लाखो रुपयांचा टॅक्स वाचवता येईल.
राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) यामध्ये गुंतवणूक करणे हा टॅक्स वाचवण्याचा एक स्मार्ट मार्ग आहे. टॅक्सपेयर्स कलम ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांच्या मर्यादेशिवाय ५० हजार रुपयांच्या अतिरिक्त कपातीचाही दावा करू शकतात. अशा परिस्थितीत या स्किमच्या माध्यमातून लाखो रुपयांचा टॅक्स वाचवता येईल.