Join us

गुड न्यूज; इन्कम टॅक्सचा भार हलका होणार, Tax Slab ही बदलण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 10:39 AM

कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी सूट दिल्यानंतर मोदी सरकार लवकरच व्यक्तिगत प्राप्तिकरातही दिलासा देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्लीः कॉर्पोरेट टॅक्समध्ये मोठी सूट दिल्यानंतर मोदी सरकार लवकरच व्यक्तिगत प्राप्तिकरातही दिलासा देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यासाठी करांच्या टप्प्यांतही बदल करण्याची तयारी सुरू आहे. प्रत्यक्ष कर संहितेसंदर्भातील शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी पॅनलकडून करांच्या दरांमध्ये कपात केली जाऊ शकते.मध्यम वर्गाला दिलासा देण्यासाठी सरकार अध्यादेश काढून दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. सरकारच्या या पावलाचा नोकरदार वर्गाला फायदा पोहोचणार आहे. ज्याचं वेतन अर्थव्यवस्थेत आलेल्या मरगळीमुळे जास्त वाढलेलं नाही किंवा वाढलेलंच त्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. पॅनलकडून करण्यात आलेल्या शिफारशीनुसार, 5 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांकडून 5 टक्के प्राप्तिकर वसूल केला जातो, त्यात पूर्णतः सूट देण्याचा सरकारच्या विचाराधीन आहे. पाच लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत ज्याचं वार्षिक उत्पन्न आहे, त्यांच्या टप्प्यात बदल करून 10 टक्के प्राप्तिकर आकारला जाऊ शकतो.

तसेच 10 ते 20 लाख रुपये वार्षिक कमावणाऱ्या नोकरदाराला 20 टक्के प्राप्तिकर द्यावा लागू शकतो. 20 लाखांहून दोन कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांकडून 30 टक्के प्राप्तिकर आणि त्याहून अधिकच उत्पन्न असलेल्यांकडून 35 टक्के प्राप्तिकर आकारला जाऊ शकतो. पॅनलनं प्राप्तिकरावर लावल्यात आलेले अधिभार आणि उपकरांना हटवण्याचा प्रस्ताव दिला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य असलेल्या अखिलेश रंजन यांच्या मते, पॅनलच्या नव्या टप्प्यामुळे कररचनेत पारदर्शकता येणार असून, नोकरदार वर्गाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :आयकर मर्यादाइन्कम टॅक्स