मोठ्या संख्येने लोक बचत खात्याद्वारे आपले पैसे बँकांमध्ये जमा करतात. याची दोन मोठी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे येथे पैसा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि दुसरीकडे गुंतवणूकदारालाही त्यावर व्याज मिळतं. म्हणूनच लोकांचं अनेकदा एकापेक्षा अधिक बचत खाती असतात.
बचत खात्यांमधील लोकांचे आकर्षण लक्षात घेऊन सर्व बँका आपल्या ग्राहकांना बँक खाते उघडण्याची सुविधा देतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का बचत खात्याच्या व्याजावरही कर लावला जातो? गुंतवणूकदारांना बचत खाती, मुदत ठेवी, पोस्ट ऑफिस योजनांवर कर भरावा लागतो. आयकर कलम ८० टीटीएअंतर्गत जेव्हा बचत खात्यावर १० हजारांपेक्षा जास्त व्याज दिलं जाईल त्यावेळी गुंतवणूकदाराला त्यावर कर भरावा लागेल.
क्लियर टॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्किट गुप्ता म्हणतात, "सेव्हिंग अकाउंटवर कर आकारला जात नाही, तर त्यात असलेल्या रकमेच्या व्याजावर कर आकारला जातो. कारण ते कमाईच्या इतर स्रोतांमध्ये येतं. आयकर विभागाच्या कलम ८० टीटीएनुसार जेव्हा तुम्हाला बचत खात्यावर १० हजाराहून अधिक व्याज मिळू लागतं, तेव्हा तुम्हाला त्यावरील कर भरावा लागतो." "ज्या व्यक्तींचं वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे त्यांना आयकर कलम ८० टीटीबी अंतर्गत त्याला ५० हजार रुपयांची सूट मिळू शकेल," असंही त्यांनी नमूद केलं.
का आकारला जातो कर?
बचत खात्यावरील व्याजातून आपण जे काही कमवाल ते कमाईच्या अन्य स्त्रोतांमध्ये येतं. काही बचत खाती उघडण्यासाठी किमान रकमेची आवश्यकता असते. बर्याच ठिकाणी ते आवश्यक नसतेही. तुम्हाला बँक, टपाल कार्यालय, सहकारी संस्थेत उघडलेल्या तुमच्या बचत खात्यावर १० हजार रुपयांहून अधिक व्याज मिळाल्यास त्यावर कर आकारला जातो.
Income Tax : जाणून घ्या कशाप्रकारे लागतो सेव्हिंग अकाऊंटवर टॅक्स
पाहा बचत खात्यात कशावर आकारला जातो कर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 08:48 PM2021-03-24T20:48:53+5:302021-03-24T20:50:33+5:30
पाहा बचत खात्यात कशावर आकारला जातो कर
Highlightsबचत खात्यात असलेल्या रकमेवर मिळणारं व्याज उत्पन्नाच्या अन्य स्त्रोतांमध्ये धरलं जातं. ६० वर्षांवरील व्यक्तींना मिळते ५० हजारांची सूट