Join us  

Income Tax : आयकर विभागाची कोलगेट विरोधात कारवाई! २४८.७४ कोटी रुपयांची कर नोटीस बजावली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 1:39 PM

Income Tax : आयकर विभागाने कोलगेट कंपनीविरोधात कारवाई केली आहे, आयकर विभागाने २४८.७४ कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे.

Income Tax : आयकर विभागाने कोलगेट विरोधात मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाने कोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडला २४८.७४ कोटी रुपयांची कर मागणी नोटीस पाठवली आहे. ही नोटीस हस्तांतरण किंमतीशी संबंधित एका प्रकरणात पाठवण्यात आली आहे. या बाबत आता कंपनीकडून प्रतिक्रिया आली. ते अपीलीय न्यायाधिकरणासमोर आव्हान देणार आहेत, असं कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

कोलगेट-पामोलिव्ह इंडिया लिमिटेड (CPIL) ओरल केअर, पर्सनल केअर यावर काम करते. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सांगितले की, त्यांना २६ जुलै २०२४ रोजी नोटीस मिळाली. ही सूचना ३१ मार्च २०२१ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी आहे.

८ तासांची ड्युटी, फ्री मेडिकल सुविधा, पीएफ स्कीम; कर्मचाऱ्यांना सर्व हक्क देणारे पहिले उद्योजक होते JRD TATA

 कंपनीला मूल्यांकन वर्ष २०२०-२१ साठी २४८,७४,७८,५११ रुपयांची मागणी करणारा एक मागणी लेखी आदेश प्राप्त झाला आहे, यामध्ये  ७९.६३ कोटी व्याजाचा समावेश आहे. या डिमांड नोटीसला आव्हान देण्यासाठी कंपनी अपीलीय न्यायाधिकरणाकडे दाद मागणार आहे. या आदेशाचा कंपनीच्या आर्थिक कामकाजावर किंवा इतर कोणत्याही कामांवर परिणाम होणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले.

कंपनीने आधीच्या मूल्यमापन वर्षांतील नकारांच्या अनुषंगाने मानक नकारांविरुद्ध अपील दाखल केले आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये CPIL ची निव्वळ विक्री ५,६४४ कोटी रुपये होती.

३१ जुलैपूर्वी रिटर्न दाखल करण्याची शेवटची मुदत

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ आहे. आयकर रिटर्न वेळेत न भरल्यास त्याचा काय परिणाम होईल? आयकर रिटर्न वेळेत दाखल न केल्यास त्याचे पुढीलप्रमाणे परिणाम होऊ शकतात.

जर करदात्याने आपले आयकर रिटर्न ३१ जुलैनंतर परंतु ३१ डिसेंबरपर्यंत दाखल केले तर त्याला पाच हजार रुपये लेट फी भरावी लागेल. जर करदात्याचे एकूण उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असेल तर एक हजार रुपये लेट फी भरावी लागेल.

आयकर रिटर्न वेळेत दाखल न केल्यास करदात्याला प्रतिमाह एक टक्का व्याज रिटर्न दाखल करण्याच्या तारखेपर्यंत कराच्या रकमेवर भरावे लागेल.

टॅग्स :इन्कम टॅक्सकर