नवी दिल्ली : वाढती महागाई आणि बेरोजगारी विक्रमी पातळीवर पोहोचल्याने हैराण झालेल्या बेरोजगारांना नोकरी मिळवणे आव्हान बनले आहे. लोकांच्या या मजबुरीचा फायदा अनेक फसवणूक करणारेही घेतात. आयकर विभागाने नुकतेच ट्विट करून लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. नोकऱ्यांचे आश्वासन देणाऱ्या फसवणूक करणाऱ्यांपासून लोकांनी सावध राहावे, असे आयकर विभागाने म्हटले आहे. अलीकडे, अनेकांना आयकर विभागात नोकरी देण्यास सांगितले गेले आणि लोकांना बनावट जॉइनिंग लेटरही जारी केले होते.
आयकर विभागाने सांगितले आहे की, विभागाच्या गट-बी आणि गट-क मधील नोकर्या केवळ कर्मचारी निवड समिती (एसएससी) द्वारे जारी केल्या जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही या विभागात नोकरी करायची असेल, तर तुम्हाला एसएससीच्या अधिकृत वेबसाइटवर संबंधित सर्व माहिती मिळेल. कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवून खोट्या नोकऱ्यांना बळी पडू नका.
याचबरोबर, कोणत्याही प्रकारच्या अज्ञात लिंकवर कधीही क्लिक करू नका, असे आयकर विभागाने म्हटले आहे. असे मेसेज तुम्हाला फसवणुकीचे बळी बनवू शकतात. या क्लिकमुळे तुम्ही मोठ्या फसवणुकीत अडकू शकता. तसेच, अनोळखी व्यक्तीकडून नोकरी मिळवून देण्याच्या दाव्याला बळी पडू नका. असे लोक तुमच्याकडे पैशाची मागणी करतील आणि नंतर पैसे घेऊन पळून जातील. त्यामुळे कोणत्याही पोर्टलवर पेमेंट करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्या.
Income Tax Department cautions the public not to fall prey to fraudulent persons misleading job-aspirants by issuing fake appointment letters for joining the Department. A public notice in this regard has been issued, which is available at this link:https://t.co/7imrJHapGgpic.twitter.com/j5ZbPF5zMw
— Income Tax India (@IncomeTaxIndia) February 22, 2022
या गोष्टींची काळजी घ्या...
- अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करणे टाळा.
- तुमची वैयक्तिक माहिती चुकीच्या हातात पडू शकते.
- कोणत्याही नंबरवरून आलेल्या कॉलवर तुम्ही असे बोलले तर तक्रार करा आणि तो नंबर ब्लॉक करा.
- सायबर क्राईमचा संशय असल्यास, गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट https://cybercrime.gov.in वर जा आणि तक्रार नोंदवा.