Lokmat Money > बिझनेस न्यूज > विदेश प्रवासात आता आयकर विभाग सहप्रवासी

विदेश प्रवासात आता आयकर विभाग सहप्रवासी

कृष्णा, आता विदेश प्रवास करताना आयकर विभागाही सहप्रवासी ठरणार आहे म्हणे? ते कसे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 04:27 AM2020-03-02T04:27:42+5:302020-03-02T04:27:52+5:30

कृष्णा, आता विदेश प्रवास करताना आयकर विभागाही सहप्रवासी ठरणार आहे म्हणे? ते कसे काय?

Income tax department fellow now traveling abroad | विदेश प्रवासात आता आयकर विभाग सहप्रवासी

विदेश प्रवासात आता आयकर विभाग सहप्रवासी

- उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, आता विदेश प्रवास करताना आयकर विभागाही सहप्रवासी ठरणार आहे म्हणे? ते कसे काय?
कृष्ण : (काल्पनिक पात्र) : अर्जुना, २०२० च्या केंद्रीय अर्थसंकल्पनात टीसीएस (टॅक्स कलेक्टेड अ‍ॅट सोरस) च्या तरतुदी वाढविण्याचा प्रस्ताव आहे. परदेशातील टूर पॅकेजवर विदेशी टूर पॅकेज आॅपरेटरला प्रवाशांकडून कलम २०६ सी (१ जी) मध्ये ५ टक्के दराने टीसीएस वसूल करावा लागेल. (ज्या प्रवाशाकडे पॅन /आधार नसेल त्यांच्याकडून १० टक्के दराने कर वसूल केला जाईल.) ‘विदेशी टूर प्रोग्राम पॅकेज’ म्हणजे ज्या टूर पॅकेजमध्ये देशाबाहेर किंवा प्रांताबाहेर जाण्यासाठी लागणारा खर्च तसेच राहण्यासाठी किंवा अन्य प्रकारचा संबंधित खर्चाचा समावेश होईल. प्रस्तुत कलम १ एप्रिल २०२० पासून लागू होईल. उन्हाळी सुट्यांची पूर्वतयारी करताना आयकर विभागही सहप्रवासी होणार हे लक्षात घ्यावे.
अर्जुन : कृष्णा, विदेशी टूर पॅकेजवर प्रवाशाकडून टीसीएस वसूल करण्यास टूर आॅपरेटर केव्हा जबाबदार असेल?
कृष्ण : अर्जुना, जर टूर आॅपरेटरकडून विदेशी टूर पॅकेज खरेदी केले असेल तर टीसीएस वसूल करावा लागेल. टीसीएस वसूल करण्यासाठी टूर पॅकेज आॅपरेटरवर किमतीची कोणतीही मर्यादा नाही त्यामुळे सर्व टुर पॅकेजवर टूर आॅपरेटरला टीसीएस वसूल करावा लागेल. टीसीएस सर्व विदेशी टूर पॅकेजवर लागू होईल. उदा : कौटुंबिक आणि व्यावसायिक दौरा तसेच यामध्ये हे प्रवास, निवास, बोर्डिंग इत्यादीसारख्या खर्चाचा समावेश होईल. जर प्रवाशाने त्याच व्यवहारावर टीडीएस कपात केल्यास त्यावर वरील तरतूद लागू होणार नाहीत. जर प्रवासी हे केंद्र किंवा राज्य सरकार, दूतावास, उच्च आयोग इत्यादी लागू अटींच्या अधीन असल्यास त्यावर वरील तरतूद लागू होणार नाही.
अर्जुन : कृष्णा, विदेशी टूर पॅकेजच्या टूर आॅपरेटरला काय काळजी घ्यावी लागेल?
कृष्ण : अर्जुना, खालीलपैकी जे आधी असेल त्यावेळेस टूर आॅपरेटरला टीसीएस वसूल करावा लागेल :
१. रक्कम प्राप्त झाल्यावर किंवा २. खातीपुस्तकात नोंद करण्यावेळी टूर आॅपरेटरने वसूल केलेला टीसीएस त्यास जमा करावा लागेल. जे विक्रेते टीसीएस वसूल करतात त्यांना ते पुढच्या महिन्याच्या सात तारखेस भरावे लागणार आणि दर तीन महिन्यांनी रिटर्न दाखल करावे लागेल.
अर्जुन : कृष्णा, विदेशी टूर पॅकेजच्या प्रवाशाने काय काळजी घ्यावी?
कृष्ण : अर्जुना, प्रवाशाने टूर आॅपरेटरला पॅन नंबरचा तपशील द्यावा, जेणेकरून टीसीएस त्याचा २६ एएसमध्ये प्रदर्शित होईल आणि तो त्यावर हक्क दाखवू शकेल, नाही तर १० टक्के दराने टीसीएस वसूल केला जाईल आणि अशा टीसीएसची मागणीसुद्धा करता येणार नाही. संस्था जर संचालक, भागीदार, कर्मचारी इत्यादींसाठी व्यवसायाच्या टूर पॅकेजची खरेदीदार असेल तर त्याच्या पॅन असलेल्या संस्थेच्या नावाने बिल भरले जावे. जेणेकरून संस्थेच्या व्यवसायाच्या उत्पन्नातून खर्च आणि टीसीएसचा दावा केला जाऊ शकेल. फॅमिली टूर पॅकेजच्याबाबतीत, झालेला खर्च हा डॉइंग म्हणून नोंदविला जाईल. उदा : अ, ब, क आणि ड एकाच कुटुंबातील व्यक्तीने सिंगापूर टूर पॅकेज आकाश टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलस कंपनीकडून खरेदी केला. ‘अ’ या व्यक्तीने सर्वांच्यावतीने ५०००० प्रत्येक व्यक्तीप्रमाणे २ लाख रुपये भरले. त्यावर टूर आॅपरेटरने १०००० (म्हणजे २००००० वर ५ टक्के दराने) चा टीसीएस वसूल केला. टुर्स पॅकेजमध्ये जाण्याचा आणि राहण्याचा खर्चसुद्धा समाविष्ट आहे. आकाश टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलला टीसीएस जमा करण्यासाठी रिटर्न दाखल करावा लागेल, जेणेकरून ‘अ’ व्यक्तीस भरलेल्या टीसीएसचा दावा करता येईल.
अर्जुन : कृष्णा, टीसीएससंबंधित वरील तरतुदीचा काय परिणाम होईल?
कृष्ण : अर्जुना, आता परदेशी दौऱ्याचा खर्च तसेच वैयक्तिक परदेशी दौºयाचा खर्चसुद्धा नोंदवावा लागेल. तसेच टूरच्या खर्चासोबत परदेशी टूरमध्ये केलेला खर्चसुद्धा नोंदवावा लागेल. जर १०००० च्या वर रोख रकमेत खर्च केला तर त्याचा दावा करता येणार नाही. जे व्यक्ती परदेशी दौºयावर जातात आणि रिटर्न दाखल करत नाहीत त्यांनाही रिटर्न दाखल करावे लागेल. आयकर विभाग रिटर्नमधील उत्पन्न आणि परदेशी दौºयासाठीच्या खर्चाची तुलना करेल आणि जर त्यामध्ये काही फरक असल्यास चौकशी सुरू केली जाईल. करदात्यास आर्थिक वर्ष २०१९-२०२० चे रिटर्न भरताना पासपोर्ट नंबर आणि २ लाखांपेक्षा जास्त खर्चाची माहिती द्यावी लागेल.
अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, आयकर विभाग आता विदेशी प्रवाशांवर खूप लक्ष ठेवून असणार आहे. भारताबाहेर प्रवास करताना जसे पासपोर्ट, व्हिसा, विदेशी चलन इत्यादींची काळजी घ्यावी लागते आणि विदेशी प्रवासात सांभाळून राहावे लागते तसेच आता आयकराच्या तरतुदीकडे लक्ष द्यावे लागेल. म्हणजेच विदेशी प्रवासात आता आयकर विभागही सहप्रवासी म्हणून राहील आणि प्रत्येक विदेशी खर्चाची नोंद टीसीएसद्वारे होईल. आता विदेशी प्रवास जसे फॅमिली टूर, हनिमून टूर, कॉन्फरन्सेस इत्यादी लक्षपूर्वक करावे लागेल. अन्यथा विदेशी वारीनंतर आयकर विभागाची वारी सुरू होईल.

Web Title: Income tax department fellow now traveling abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.