Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्राप्तीकर विभागाने या नियमामध्ये केला बदल, त्वरित जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान  

प्राप्तीकर विभागाने या नियमामध्ये केला बदल, त्वरित जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान  

Income tax Update: बँक किंवा पोस्ट ऑफिसशी संबंधित मोठे ट्रान्झॅक्शन करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्तावाची बातमी आहे. प्राप्तिकर विभागाने एक मोठ्या नियमामध्ये बदल केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 04:18 PM2022-10-28T16:18:38+5:302022-10-28T16:20:32+5:30

Income tax Update: बँक किंवा पोस्ट ऑफिसशी संबंधित मोठे ट्रान्झॅक्शन करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्तावाची बातमी आहे. प्राप्तिकर विभागाने एक मोठ्या नियमामध्ये बदल केला आहे.

Income tax department has changed this rule, know immediately, otherwise there will be loss | प्राप्तीकर विभागाने या नियमामध्ये केला बदल, त्वरित जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान  

प्राप्तीकर विभागाने या नियमामध्ये केला बदल, त्वरित जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान  

नवी दिल्ली - बँक किंवा पोस्ट ऑफिसशी संबंधित मोठे ट्रान्झॅक्शन करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्तावाची बातमी आहे. प्राप्तिकर विभागाने एक मोठ्या नियमामध्ये बदल केला आहे. प्राप्तिकर विभागाकडून लागू करण्यात आलेल्या नव्या नियमानुसार जक कुठलीही व्यक्ती एका आर्थिक वर्षामध्ये बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये  २० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिकची रोख रक्कम जमा करत असेल तर त्यांना अनिवार्यपणे पॅनकार्ड आणि आधारकार्ड जमा करावे लागेल.
इन्कम टॅक्स रूल्स, २०२२ अन्वये सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने नवे नियम लागू केले आहेत. त्यांची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या नियमाला नोटिफाय करण्यात आले आहे. 
- एका आर्थिक वर्षामध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक खात्यांमध्ये जर कुणी २० लाख रुपये भरणार असेल, तर त्याला पॅन आणि आधारकार्ड जमा करावे लागेल. 
-  एका आर्थिक वर्षात कुणी बँकिंग कंपनी किंवा को-ऑपरेटिव्ह बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कुणी एक किंवा अधिक खात्यांमधून २० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यासही पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक असणे आवश्यक असेल.   
- बँकिंग कंपनी, को-ऑपरेटिव्ह बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये करंट अकाऊंट किंवा कॅश क्रेडिट अकाऊंट उघडल्यावरही पॅनकार्ड आणि आधारकार्ड द्यावं लागेल. 
- जर कुणी करंट अकाऊंट उघडलं तर त्यालाही पॅनकार्ड देणे अनिवार्य असेल. 
- जर कुणाचे बँक अकाऊंट आधीपासूनच पॅनकार्डशी लिंक असेल, किंवा त्याला देवाण-घेवाणीसाठी पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करावे लागेल.
प्राप्तिकर विभागाने रोख रकमेमधील अफरातफर कमी करण्यासाठी आणि देखरेखीसाठीच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. प्राप्तिकर विभागाकडे आर्थिक देवाण-घेवाणीबाबत अपडेट माहिती राहावी, म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता आधारकार्ड आणि पॅनकार्ड जोडले गेल्यामुळे अधिकाधिक लोक प्राप्तिकराच्या चौकटीत येतील. व्यवहार करताना पॅन क्रमांक असल्याने प्राप्तिकर विभागाची नजर तुमच्यावर असेल.  

Web Title: Income tax department has changed this rule, know immediately, otherwise there will be loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.