Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयकर ई-फायलिंग पन्नास लाखांवर

आयकर ई-फायलिंग पन्नास लाखांवर

आयकर दात्यांसाठी ‘वनटाईम पासवर्ड’ अर्थात ‘ओटीपी’वर आधारित ई-फायलिंग आयकर विवरण पत्र योजनेचा आकडा ५० लाखांवर गेला आहे

By admin | Published: January 11, 2016 03:08 AM2016-01-11T03:08:41+5:302016-01-11T03:08:41+5:30

आयकर दात्यांसाठी ‘वनटाईम पासवर्ड’ अर्थात ‘ओटीपी’वर आधारित ई-फायलिंग आयकर विवरण पत्र योजनेचा आकडा ५० लाखांवर गेला आहे

Income tax e-filing is up to fifty lakhs | आयकर ई-फायलिंग पन्नास लाखांवर

आयकर ई-फायलिंग पन्नास लाखांवर

नवी दिल्ली : आयकर दात्यांसाठी ‘वनटाईम पासवर्ड’ अर्थात ‘ओटीपी’वर आधारित ई-फायलिंग आयकर विवरण पत्र योजनेचा आकडा ५० लाखांवर गेला आहे. तसेच ३९ लाखांवर लोकांचे आधार क्रमांक ‘पॅन’ डेटाबेसला जोडले आहेत.
आयकर खात्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बंगळुरूचे केंद्रीय संस्करण केंद्र आता पूर्णपणे कागदाविना चालत असून, तेथे फक्त ई-फायलिंग स्वीकारले जाते. गेल्या वर्षी सात महानगरांमध्ये ही योजना पथदर्शी स्वरूपात राबविण्यात आली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. ई-फायलिंग करणारे करदाते ५० लाखांवर गेले आहेत. जास्तीत जास्त लोक ई-फायलिंग स्वीकारत आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या गेल्या वर्षीच्या अधिसूचनेनुसार ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये वा त्यापेक्षा कमी आहे व ज्याचा कसला परतावा नाही, अशा व्यक्ती इलेक्ट्रॉनिक कोड तयार करून आपला मोबाईल वा ई-मेल आयडीद्वारे आपल्या रिटर्नला प्रमाणित करू शकतो.

Web Title: Income tax e-filing is up to fifty lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.