Join us

प्राप्तिकर सूट मर्यादा वाढणार

By admin | Published: February 10, 2015 11:14 PM

देशातील बचतीचा घटलेला दर, विकास कामांसाठी सरकारला येत असलेली निधीची अडचण या पार्श्वभूमीवर येत्या २८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : देशातील बचतीचा घटलेला दर, विकास कामांसाठी सरकारला येत असलेली निधीची अडचण या पार्श्वभूमीवर येत्या २८ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकरातील सूट किमान २० ते कमाल ५० हजार रुपयांची मर्यादा वाढविण्याचे संकेत मिळत आहेत.गेल्या वर्षभराच्या बचतीच्या आकेवारीवर नजर टाकली तर बचतीच्या दरात ५.३ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नेमक्या उपायोजना करण्याच्या दृष्टीने प्राप्तिकरातील कलम ८० सी अंतर्गत मर्यादा वाढविण्याचा विचार पुढे आल्याचे वृत्त आहे. २०१४-१५ मध्ये ही मर्यादा एक लाखावरून दीड लाख रुपये इतकी वाढविण्यात आली होती. तसेच, मर्यादा वाढवितानाच पीपीएफ, गृहकर्जातील ८० सी कलमांतर्गत मिळणाऱ्या सुटीची मर्यादा वाढविली होती. त्याच धर्तीवर ८० सी कलमांचा लाभ गुंतवणुकीच्या ज्या साधनांना मिळतो, त्यांची मर्यादा वाढविण्याचा विचार करत आहे.यामध्ये प्रामुख्याने प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन योजना, विमा योजना, इक्विटी लिंकड् सेव्हिंग्ज स्कीम, गृहकर्जाची मर्यादा या योजनांची मर्यादा वाढविण्याचा प्रयत्न होणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)