इन्कम टॅक्स हा करप्रणालीमधील एक महत्त्वाचा कर आहे. मध्यमवर्गीयांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांचा या कराशी संबंध येत असतो. दरम्यान, आता सरकार इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. करदात्यांना सवलत देण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वित्तमंत्रालयाकडून याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने हल्लीच करदात्यांना दिलासा देताना करामध्ये सवलतीचा नवा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार आतापासून करदात्यांना उपचारांसाठी मिळणाऱ्या रकमेवर लागणाऱ्या इन्कम टॅक्सवर सवलतीचा फायदा मिळेल. म्हणजेच तुम्हाला या रकमेवर करभरणा करावा लागणार नाही.
प्राप्तिकर विभाग हा करदात्यांच्या सुविधेसाठी वेळोवेळी नियमांमध्ये बदल करत असतो. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड सीबीडीटीकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सीबीडीटीने हल्लीच नव्या अटी आणि कोरोनावर उपचारांसाठी होणाऱ्या खर्चावर इन्कम टॅक्समधून सवलत मिळवण्यासाठी एक फॉर्म जारी केला होता.
५ ऑगस्ट २०२२ च्या अधिसूचनेनुसार आतापासून तुम्हाला तुमच्या नियोक्त्याकडे काही कागदपत्रांसह इन्कमटॅक्स विभागाकडे एक फॉर्म जमा करावा लागेल. त्यामध्ये नियोक्ता किंवा नातेवाईकांकडून कोरोनावरील उपचारांसाठी मिळालेल्या रकमेवर कर सवलतीसाठी दावा करता येईल.
त्याशिवाय प्राप्तिकर विभागाने लोकांच्या सुविधा विचारात घेऊन डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी करामध्ये सवलतीत लागणाऱ्या फॉर्मला डिजिटल केले होते. त्यामुळे लोकांना कुठलीही अडचण येऊ नये आणि लोकांनाही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तसेच ऑफिसच्या फेऱ्याही माराव्या लागणार नाहीत.