- उमेश शर्मा
(लेखक चार्टर्ड अकाउंटंट आहेत)
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सीबीडीटीने २0 में २0२१ रोजी परिपत्रक जाहीर केले ज्यात आयकरातील विविध रिटर्नसच्या आणि अनुपालनाच्या मुदती वाढविण्यात आल्या आहेत?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, महामारीचा अजून चालू असलेला कहर ध्यानात घेऊन विविध अनुपालनाच्या वेळेच्या मर्यादा वाढवल्या आहेत. जेणेकरून करदात्याला आधार मिळेल.
अर्जुन : वरील परिपत्रकात कोणत्या तारखा वाढविण्यात आल्या आहेत?
कृष्णा : अर्जुन, आर्थिक वर्ष २0२0-२१ साठी काही महत्त्वाच्या तारखा वाढविण्यात आल्या आहेत त्या खालीलप्रमाणे :
१) टीडीएस रिटर्नची चौथ्या तिमाहीची तारीख ३१ मे २0२१ होती, ती आता ३०जून २0२१ असेल.
२) चौथ्या तिमाहीसाठी फॉर्म १६ टीडीएस प्रमाणपत्र जारी करण्याची मुदत १५ जून २0२१ होती, ती आता १५ जुलै २0२१ असेल.
३) ऑडिट लागू नसलेल्यांचे आयकर रिटर्न भरण्याची तारीख ३१ जुलै २0२१ होती, ती आता ३0 सप्टेंबर २0२१ असेल.
४) कर ऑडिट अहवाल किंवा इतर ऑडिट अहवाल भरण्यासाठीची तारीख ३0 सप्टेंबर २0२१ होती, ती आता ३१ ऑक्टोबर २0२१ असेल.
५) ऑडिट असलेल्यांचे आयकर रिटर्न भरण्याची तारीख ३१ ऑक्टोबर २0२१ होती, ती आता ३0 नोव्हेंबर २0२१ असेल
अर्जुन : मुदतवाढीचा लाभ घेताना कोणती काळजी घ्यावी?
कृष्ण : आयकर रिटर्न दाखल करतेवेळी हे लक्षात ठेवावे की, देय तारीख ही फक्त रिटर्न दाखल करण्यासाठी वाढविण्यात आली आहे. त्यामुळेच जर स्वयंचलित कर हा १ लाखापेक्षा जास्त आला आणि जर मूळ देय तारखेच्या आत रिटर्न भरले नाही तर तर कलम २३४एच्या अंतर्गत व्याज लागेल.
अर्जुन : वरील परिपत्रक कुठपर्यंत आधार देऊ शकेल?
कृष्ण : केंद्र शासनाने विविध अनुपालनाच्या देय तारखा वाढवून करदात्याला आधार दिला आहे; परंतु कर भरण्यासाठी केवळ मर्यादित सवलत मिळेल.
Income Tax: आयकर रिटर्न : मुदत वाढवली, तरीही...
Income Tax: सीबीडीटीने २0 में २0२१ रोजी परिपत्रक जाहीर केले ज्यात आयकरातील विविध रिटर्नसच्या आणि अनुपालनाच्या मुदती वाढविण्यात आल्या आहेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 05:09 AM2021-05-24T05:09:53+5:302021-05-24T05:10:42+5:30