Lokmat Money > बिझनेस न्यूज > करदात्यांना दिलासा! आयकर विभागाकडून तक्रार दाखल करण्यासाठी नवीन सुविधा, वाचा सविस्तर...

करदात्यांना दिलासा! आयकर विभागाकडून तक्रार दाखल करण्यासाठी नवीन सुविधा, वाचा सविस्तर...

income tax : आयकर विभागाने जारी केलेल्या 3 ईमेल आयडीवर करदात्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी केल्या तर त्या जलदगतीने सोडवता येतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 04:28 PM2021-08-08T16:28:45+5:302021-08-08T16:29:39+5:30

income tax : आयकर विभागाने जारी केलेल्या 3 ईमेल आयडीवर करदात्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी केल्या तर त्या जलदगतीने सोडवता येतील.

income tax latest news it department released 3 new email ids for complaints taxpayers check details | करदात्यांना दिलासा! आयकर विभागाकडून तक्रार दाखल करण्यासाठी नवीन सुविधा, वाचा सविस्तर...

करदात्यांना दिलासा! आयकर विभागाकडून तक्रार दाखल करण्यासाठी नवीन सुविधा, वाचा सविस्तर...

नवी दिल्ली : आयकर विभागाने (Income Tax department)  करदात्यांच्या सोयीसाठी विशेष सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत आता करदात्यांना (Taxpayers)  वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. खरंतर, आयकर विभागाने करदात्यांना फेसलेस असेसमेंट स्कीम (Faceless Assessment Scheme) अंतर्गत अनेक पैलूंवर तक्रारी दाखल करण्यासाठी तीन वेगवेगळे अधिकृत ईमेल आयडी जारी केले आहेत. करदात्यांच्या चार्टरसोबत मेल करतेवेळी करदाते सेवा सुधारण्यासाठी विभागाने प्रलंबित प्रकरणांशी संबंधित तक्रारी नोंदवण्यासाठी फेसलेस स्कीमअंतर्गत समर्पित ई-मेल आयडी तयार केले आहेत.

करदात्यांसाठी तक्रार करणे सोपे होईल
आयकर विभागाने म्हटले आहे की, यामुळे करदाते त्यांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी तीन वेगवेगळ्या ईमेल आयडीद्वारे तक्रार करू शकतात. दरम्यान, फेसलेस असेसमेंट स्कीम अर्थात ई-असेसमेंट अंतर्गत, करदाते आणि कर अधिकारी यांच्यात कोणताही सामना होत नाही. यामुळे करदात्यांना कोणतीही तक्रार दाखल करणे सोपे होईल. तसेच, त्यांची समस्या देखील सहज सोडवली जाईल. ही स्कीम केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. या स्कीमअंतर्गत करदात्यांना आयकर विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला भेटण्याची गरज नाही.


कोणत्या ई-मेल आयडीवर कोणती तक्रार करता येईल?
आयकर विभागाने जारी केलेल्या 3 ईमेल आयडीवर करदात्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी केल्या तर त्या जलदगतीने सोडवता येतील. जाणून घ्या, कोणत्या ई-मेल आयडीवर कोणत्या प्रकारची तक्रार करता येईल.
>> फेसलेस असेसमेंट स्कीमसाठी करदाते Samadhan.faceless.assessment@incometax.gov.in वर तक्रार करू शकतात.
>> करदाते फेसलेस पेनल्टीसाठी samadhan.faceless.penalty@incometax.gov.in चा वापर करू शकतात.
>> फेसलेस अपीलसाठी samadhan.faceless.appeal@incometax.gov.in वर ई-मेल केले तर ही समस्या लवकरच सोडवली जाईल.

Web Title: income tax latest news it department released 3 new email ids for complaints taxpayers check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.