Join us

Income Tax Rule: उद्यापासून इनकम टॅक्‍सच्या नियमात होतोय मोठा बदल; जाणून घ्या, नाहीतर येईल अडचण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 4:46 PM

Cash Deposit New Rule : इनकम टॅक्स (15th Aamendment) रूल्स, 2022 नुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) नवे नियम जारी केले आहेत. हे नियम उद्यापासून म्हणजेच 26 मेपासून लागू होतील.

जर आपण बँक अथवा पोस्ट ऑफिसशी संबंधित मोठे व्यवहार करत असाल, तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. कारण उद्यापासून इनकम टॅक्स विभाग एका मोठ्या नियमात बदल करत आहे. आता या नव्या नियमानुसार, जर एखादी व्यक्ती कुठल्याही एका आर्थिक वर्षात बँक अथवा पोस्ट ऑफीसमध्ये 20 लाख रुपये अथवा याहून अधिक रोख जमा करत असेल तर त्या व्यक्तीस पॅन (PAN) आणि आधार (Aadhaar) जमा करणे अनिवार्य असेल. 

इनकम टॅक्स (15th Aamendment) रूल्स, 2022 नुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) नवे नियम जारी केले आहेत. हे नियम उद्यापासून म्हणजेच 26 मेपासून लागू होतील. हा नियम अधिसूचित करण्यात आला आहे.

केव्हा आवश्यक असेल PAN आणि Aadhaar, जाणून घ्या - - जर कुणी एका आर्थिक वर्षात एक अथवा एकहून अधिक खात्यात 20 लाख रुपये कॅश जमा करत असेल तर त्याला पॅन आणि आधार जमा करावे लागेल.- एका आर्थिक वर्षात बँकिंग कंपनी, सहकारी बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये कुठल्याही एका अथवा एकहून अधिक खात्यांमधून 20 लाख रुपये काढायचे असले तरी पॅन-आधार लिंक असणे आवश्यक असेल.- बँकिंग कंपनी, को-ऑपरेटिव बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये करंट अकाउंट अथवा कॅश क्रेडिट अकाउंट उघडतानाही पॅन-आधार देणे आवश्यक असेल.- जर एखाद्याला करंट अकाउंट ओपन करायचे असेल तरीही Pan Card अनिवार्य असेल.- जर एखाद्याचे बँक अकाउंट आधीपासूनच पॅनला लिंक असले तरी, त्याला व्यवहारासाठी पॅन-आधार लिंक करावे लागेल.

महत्वाचे म्हणजे, सरकारच्या या निर्णयामुळे आयकर विभाग लोकांच्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात अपडेट राहील. तसेच, आता आधार पॅनला जोडल्यानंतर, आधिकाधिक लोक इनकम टॅक्सच्या कक्षेत येतील.

टॅग्स :इन्कम टॅक्सकेंद्र सरकारबँकपोस्ट ऑफिस