Join us

FirstCry च्या फाऊंडरना इन्कम टॅक्सची नोटीस, ५ कोटी डॉलर्सच्या कर चोरीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 11:38 AM

इन्कम टॅक्स विभागानं संस्थापकांकडे स्पष्टीकरण मागितलंय.

इन्कम टॅक्स विभागानं फर्स्टक्रायसह (FirstCry) तीन युनिकॉर्नच्या संस्थापकावर कर चोरीच्या प्रकरणाची चौकशी करत आहे. वृत्तसंस्था ब्लूमबर्गला सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. माहितीनुसार, तीन युनिकॉर्न FirstCry.com, Globalbees Brands Ltd. आणि Xpressbees च्या संस्थापकाची करचुकवेगिरी प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. फर्स्टक्रायचे जे शेअर्स त्यांच्याकडे आहे, त्याच्याशी निगडीत व्यवहारांवरील ५ कोटी डॉलर्सपेक्षा अधिकचा कर का भरला नाही, यासंदर्भात इन्कम टॅक्स विभागानं संस्थापक सुपम माहेश्वरी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलंय.

गुंतवणूकदारांचीही चौकशीमहेश्वरी यांच्या व्यतिरिक्त विभागानं फर्स्टक्रायच्या सहा गुंतवणूकदारांचीदेखील चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये प्रायव्हेट इक्विटी फर्म क्रिस कॅपिटल मॅनेजमेंट आणि सुनील भारती मित्तल यांच्या फॅमिली ऑफिसचा समावेश आहे. 

२०२१ मध्ये नफाफर्स्टक्रायच्या व्यवसायाबद्दल बोलायचं झाले तर, नवजात आणि लहान मुलांच्या उत्पादनांच्या बाबतीत ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. अनेक वर्षांच्या तोट्यानंतर, फर्स्ट क्राय प्रथमच आर्थिक वर्ष २०२१ नफ्यात आली. हे देशातील काही स्टार्टअप्सपैकी एक आहे जे ऑपरेशनल स्तरावर नफ्यात आल्यानंतर IPO मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये महिंद्रा रिटेलची १२-१३ टक्के आणि अझीझ प्रेमजींची कंपनी प्रेमजी इन्व्हेस्टची ९-११ टक्के भागीदारी आहे.

टॅग्स :व्यवसायइन्कम टॅक्स