भारतीय आयकर विभागाच्या अधिकार्यांनी बुधवारी पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील चीनी पीसी मेकर लेनोवोच्या (Lenovo) प्रकल्पाची तपासणी केली. आयकर अधिकाऱ्यांनी (Income Tax Officials) बंगळुरू येथे असलेल्या कंपनीच्या कार्यालयाचीही तपासणी केली. तपासाचा एक भाग म्हणून आयकर अधिकारी आल्याची माहिती दोन सूत्रांनी रॉयटर्सला दिली.
अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान लेनोवो कर्मचाऱ्यांचे लॅपटॉप तपासले. अधिकाऱ्यांनी तपासाचा भाग म्हणून तपासणी दरम्यान आणि नंतर लेनोवोच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
लेनोवोनं काय म्हटलं?
लेनोवोनं आयकर अधिकाऱ्यांनी केलेल्या या तपासणीची पुष्टी केली आणि अधिकाऱ्यांना आपण सहकार्य केल्याचंही सांगितलं. सर्व आवश्यक ती मदत केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. "आम्ही व्यवसाय करतो त्या प्रत्येक अधिकारक्षेत्रात आम्ही सर्व लागू कायदे, नियम आणि अहवाल आवश्यकतांचे काटेकोरपणे पालन करतो," असं कंपनीनं म्हटलंय. यापूर्वी बुधवारी आयकर अधिकार्यांनी तामिळनाडूमधील कॉन्ट्रॅक्ट उत्पादक फ्लेक्स लिमिटेडच्या फॅसिलिटीजीचही पाहणी केल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं होतं.
चिनी कंपनी Lenovo च्या ऑफिसमध्ये पोहोचले इन्कम टॅक्स अधिकारी, जाणून घ्या प्रकरण
अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान लेनोवो कर्मचाऱ्यांचे लॅपटॉप तपासले.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 11:25 AM2023-09-28T11:25:18+5:302023-09-28T11:25:43+5:30