Join us  

LUX कंपनीवर आयकरच्या धाडी! मालकाच्या घरावर आणि ऑफिसवरही सकाळी ६ वाजता छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 3:39 PM

LUX ही कोलकाता स्थित कंपनी आहे. या कारवाईबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आयकर विभागाने देशातील सर्वात मोठी कापड आणि इनर वेअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लक्सच्या अनेक ठिकाणी छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ६ वाजता इन्कम टॅक्स विभागाच्या टीमने पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि नवी दिल्ली येथील लक्स इंडस्ट्रीजच्या ऑफिस आणि मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटवर एकाच वेळी छापे टाकले. याशिवाय लक्स कंपनीच्या प्रवर्तकांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले.

चाळीशीत रिटायर्मेंट? ‘फायर’ फॉर्म्युला वापरा; पैसा कमावण्याची कटकट दूर होईल

लक्स ही कोलकाता स्थित कंपनी आहे. या कारवाईबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. कंपनीवर १५० कोटी रुपयांची करचोरी केल्याचा आरोप आहे. दरम्यान, शुक्रवारी लक्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. दुपारी २ वाजता ३.३२ टक्क्यांनी घसरून १२७२ रुपयांवर व्यवहार करत होता.

गेल्या वर्षभरापासून लक्स कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. एका वर्षात स्टॉक २० टक्क्यांहून अधिक घसरला. तर या कालावधीत निफ्टी निर्देशांक १२ टक्क्यांनी वाढला आहे. 

ही कंपनी पूर्वी बिस्वनाथ होजरी मिल्स म्हणून ओळखली जात होती, ही भारतातील अग्रगण्य अंडरवेअर बनवणारी कंपनी आहे, याचे मुख्यालय कोलकाता येथे आहे.

गेल्या काही दिवसापासून कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत, मागील वर्षाच्या तुलनेत २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत कंपनीच्या नफ्यात ६४ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफा ५१.५ कोटी रुपयांवरून १८.३ कोटी रुपयांवर घसरला आहे. तर उत्पन्न ५६७ कोटींवरून ५२३ कोटींवर घसरले आहे.

टॅग्स :इन्कम टॅक्स