नवी दिल्ली: आयकर विभागाने(Income Tax Department) करचुकवेगिरीच्या तपासाचा एक भाग म्हणून चिनी दूरसंचार कंपनी Huawei च्या भारतातील अनेक कार्यालयांवर छापे टाकले आहेत. अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी कंपनीच्या दिल्ली, गुरुग्राम (हरियाणा) आणि बंगळुरू येथील कार्यलयांवर छापे टाकण्यात आले आहेत. यावेळी अधिकार्यांनी आर्थिक कागदपत्रे, खातेवही आणि कंपनीच्या नोंदींची तपासणी केली आणि काही नोंदी जप्त करण्यात आल्या आहेत.
या कारवाईबाबत कंपनीने एका निवेदनात म्हटले की, "आम्हाला आयकर पथक आमच्या कार्यालयात आल्याची आणि काही कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. Huawei ला विश्वास आहे की भारतातील आमचे ऑपरेशन्स सर्व कायदे आणि नियमांचे पालन करुन सुरू आहे. अधिक माहितीसाठी आम्ही संबंधित सरकारी विभागांशी संपर्क साधू आणि नियमानुसार पूर्ण सहकार्य करू आणि योग्य प्रक्रियेचे पालन करू.
Huawei ला 5G सेवांच्या चाचणीतून वगळण्यात आले सरकारने Huawei ला 5G सेवांच्या चाचणीपासून दूर ठेवले आहे. दूरसंचार ऑपरेटरना त्यांचे नेटवर्क राखण्यासाठी त्यांच्या जुन्या करारांतर्गत Huawei आणि ZTE कडून दूरसंचार गियर घेण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु दूरसंचार क्षेत्रावरील राष्ट्रीय सुरक्षा निर्देशानुसार कोणतेही नवीन व्यापार करार करण्यापूर्वी सरकारची परवानगी आवश्यक असेल.
गेल्या वर्षी या चिनी कंपन्यांवर कारवाईआयकर विभागाने गेल्या वर्षी Xiaomi आणि Oppo सारख्या चिनी मोबाईल कम्युनिकेशन्स आणि हँडसेट निर्मात्यांविरुद्ध आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर भारतीय कर कायदे आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई केली होती आणि 6,500 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचा दावा केला होता.
चीन विरोधा कारवाईया आठवड्याच्या सुरुवातीला माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणास्तव, Tencent Xriver, Nice Video Baidu, Viva Video Editor आणि गेमिंग अॅप फ्री फायर यासह चिनी लिंक असलेले आणखी 54 अॅप ब्लॉक केले आहेत. पूर्व लडाखमधील लष्करी अडथळ्यानंतर भारतात कार्यरत असलेल्या चिनी-समर्थित कंपन्या किंवा संस्थांवर कारवाई केली जाते. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) भारतात मोबाइल अॅप्सद्वारे झटपट कर्ज देणाऱ्या चिनी-नियंत्रित कंपन्या आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांवर (NBFCs) छापे टाकून त्यांची मालमत्ता जप्त केली आहे.