नवी दिल्ली : आयकर परताव्यात मागील ५ वर्षांत तेजी आली असल्याचे ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ने (सीआयआय) जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. २०१८ ते २०२३ या कालावधीत आयकर परताव्याचा प्रतीक्षा कालावधी घटला असल्याचे मत ८९ टक्के व्यक्ती आणि ८८ टक्के कंपन्यांनी व्यक्त केले आहे.
सर्वेक्षणानुसार, करव्यवस्था सुव्यवस्थित, सरळ व स्वयंचलित करण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडील काही वर्षांत अनेक उपाय केले आहेत.
यामुळे वाढला करदात्यांचा विश्वास
nपरतावा प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे करदात्यांचा विश्वास वाढला आहे.
nसर्वेक्षणात ५६.४ टक्के व्यक्ती आणि ४३.६ टक्के संस्था सहभागी झाल्या होत्या.
७५.५% व्यक्ती आणि २२.४ टक्के संस्थांनी आपल्या अनुमानित करापेक्षा अधिक टीडीएस भरलेला नाही.
८७% व्यक्ती आणि ८९ टक्के कंपन्यांना वाटते की, कर परतावा मिळण्याचा दावा करण्याची प्रक्रिया सुविधाजनक आहे.