ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - काल जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर पाच टक्क्यांपर्यंत कमी करून मध्यमवर्गियांना दिलासा देण्यात आला आहे. योग्य माहिती असल्यास कर वाचवणे कठीण काम नाही. प्राप्तिकर कायद्यात काही अशा तरतुदी आहेत ज्याद्वारे तुम्ही करातून सवलत मिळवू शकता. त्या तरतुदींचा अवलंब करून तुम्ही प्राप्तिकर वाचवू शकता. वाचा काय आहेत त्यापैकी आठ टिप्स...
जॉईंन्ट होम लोम - जर तुम्ही पती/पत्नी मिळून एकत्रपणे एखादे घर घेतले असेल, त्याचे गृहकर्जही दोघे मिळून भरत असाल तर तुम्ही दोघेही 2 ते 2.5 लाखांपर्यंतच्या डिडक्शनसाठी पात्र ठरता. तसेच तुमचा मुलगा किंवा मुलगी कमावती असेल आणि ते तुमच्या गृहकर्जात सहभागी असतील तर त्यांनाही या डिडक्शनचा फायदा मिळू शकतो.
पर्यटन - पगारी नोकरदार म्हणून तुम्ही चार कॅलेंडर वर्षात दोन वेळा देशांतर्गत पर्यटन केले. तर तुम्ही एलटीसी सवलत मिळवू शकता. या चार वर्षांचा चालू ब्लॉक 1 जानेवारी 2014 पासून सुरू झाला आहे. जर तुम्ही आतापर्यंत प्रवास केला नसेल तर करा आणि योग्य हिशोब आणि बिले बाळगून एलटीसी क्लेम करा
इतर लाभ - बदली झाल्यानंतर नियुक्तीच्या नव्या ठिकाणी गेल्यावर पहिल्या 15 दिवसांसाठी तुम्हाल हॉटेलमध्ये थांबण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यावर कर आकारला जात नाही.
परविहन - ट्रान्सपोर्ट अलाउन्सवर सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला खर्चाचा पुरावा द्यावा लागत नाही. पण जर तुम्ही अधिकृत प्रवास दाखवत असाल तर मात्र तुम्हाल बिल जमा करावे लागलील. त्यावर कंपनी तुमचा खर्च परत देईल. त्यावरही कर लागणार नाही
पीएफ - पीपीएफ काढण्यासाठी पाच वर्षांचा ब्लॉक-इन-पीरियड असतो. पण या जमा रकमेवर तुम्ही काही खास उद्देशाने कर घेऊ शकता. पण लक्षात असू द्या की प्रत्येक उद्देशासाठी मिळणाऱ्या कर्जाची मर्यादाही वेगवेगळी होती.
घरभाडे - जर कंपनी तुम्हाला घरभाडे भत्ता देत नसेल तर तुम्ही सेक्शन 80जीजी नुसार डिडक्शनसाठी दावा करू शकता. पण त्यासाठी तुमची पत्नी/पती, वा मुलांचे स्वत:चे घर असता कामा नये. तसेच हे डिडक्शन दरमहा 5 हजार रुपयांपर्यंतच मिळेल.
एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लान - जर तुम्ही काम करत असलेल्या आस्थापनाने तुम्हाला एम्पॉई स्टॉक ऑप्शन प्लानचा भाग बनवले असेल तर तुम्हाला कर देण्याची आवश्यकता नाही.
एचआरए आणि होम लोन - जर तुम्हाला एचआरए मिळत असेल आणि तुम्ही कर्जसुद्धा घेतलेले असेल तर तुम्हाला घरभाडे सवलत आणि गृहकर्ज डिडक्शन दोन्ही फायदे एकत्र घेऊ शकता. पण त्यासाठी तुम्ही जिथे काम करता त्या शहरात तुमचे घर असता कामा नये. तसेच तुम्ही जिथे घर घेतले असेल तेथून रोज येणं जाणं शक्य नसेल.