Lokmat Money > बिझनेस न्यूज > Income Tax Return: काही तास शिल्लक! नाहीतर ५००० रुपयांचा दंड भरा, ITR ची मुदत वाढणार नाही

Income Tax Return: काही तास शिल्लक! नाहीतर ५००० रुपयांचा दंड भरा, ITR ची मुदत वाढणार नाही

ITR Last date not extend: आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. ते शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंतच भरता येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 08:31 PM2021-12-31T20:31:42+5:302021-12-31T20:32:15+5:30

ITR Last date not extend: आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. ते शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंतच भरता येणार आहे.

Income Tax Return: A few hours left! Otherwise pay a penalty of Rs.5000, Last date not to extended | Income Tax Return: काही तास शिल्लक! नाहीतर ५००० रुपयांचा दंड भरा, ITR ची मुदत वाढणार नाही

Income Tax Return: काही तास शिल्लक! नाहीतर ५००० रुपयांचा दंड भरा, ITR ची मुदत वाढणार नाही

अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी आयटीआर भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट पणे सांगितले आहे. यामुळे ज्या लोकांना अद्याप आयकर भरला नाहीय किंवा जे मुदत वाढ मिळण्याची वाट पाहत आहेत, त्यांना एकतर काही तासांत आयटीआर भरावा लागणार आहे, अन्यथा ५ हजारांचा दंड भरावा लागणार आहे. 

आयकर भरण्याची तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये महसूलचे सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याचे काम आरामात आणि सतत सुरु आहे. मोठ्या संख्येने आयकर भरला जात आहे. अशातच लोक कशासाठी आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी करत आहेत माहिती नाही. याची शेवटची तारीख आज आहे, सध्यातरी मुदत वाढ करण्याचा कोणताही विचार नाही, असे बजाज म्हणाले. 

31 डिसेंबरच्या दुपारी ३ वाजेपर्यंत 5.62 कोटी आयकर रिटर्न दाखल झाले आहेत. एकट्या शुक्रवारी २० लाखांहून अधिक आयटीआर फाईल झाले आहेत. दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत एका तासात 3.44 लाख आयटीआर भरले गेले आहेत, असे त्यांनी सांगितले. 

महसूल सचिव तरुण बजाज यांनीही सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 60 लाख अधिक रिटर्न भरले आहेत. 30 डिसेंबर 2020 अखेरपर्यंत केवळ 4.83 कोटी रिटर्न भरले गेले होते, तर यावर्षी 30 डिसेंबरपर्यंत 5.43 कोटी रिटर्न भरले गेले आहेत. कोरोना महामारीमुळे, गेल्या वर्षी 31 डिसेंबर 2021 पर्यंतच आयकर रिटर्न भरले गेले.

त्यानंतर 5000 पर्यंत दंड भरावा लागेल
आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. ते शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंतच भरता येणार आहे. यानंतर, आयटीआर रिटर्न भरण्यासाठी 5000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. तुम्हाला 5000 रुपयांचा दंड टाळायचा असेल तर तुमच्याकडे तुमचे रिटर्न भरण्यासाठी फक्त काही तास आहेत. मात्र, ज्यांची कमाई 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना फक्त 1000 रुपये दंड भरावा लागेल.

Web Title: Income Tax Return: A few hours left! Otherwise pay a penalty of Rs.5000, Last date not to extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.