Lokmat Money > बिझनेस न्यूज > इनकम टॅक्स रिटर्न्स भरणाऱ्यांना झटका; 'या' तारखेनंतर लागेल 5 हजारांचा दंड

इनकम टॅक्स रिटर्न्स भरणाऱ्यांना झटका; 'या' तारखेनंतर लागेल 5 हजारांचा दंड

ITR Filing: आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 02:21 PM2023-07-03T14:21:50+5:302023-07-03T14:40:05+5:30

ITR Filing: आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे.

Income Tax Return: ITR Filing: Income Tax Return; 5 thousand fine will be charged after due date | इनकम टॅक्स रिटर्न्स भरणाऱ्यांना झटका; 'या' तारखेनंतर लागेल 5 हजारांचा दंड

इनकम टॅक्स रिटर्न्स भरणाऱ्यांना झटका; 'या' तारखेनंतर लागेल 5 हजारांचा दंड

Income Tax Return: आयकर रिटर्न (Income Tax Return) भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. ज्या लोकांचे उत्पन्न करपात्र आहे, त्यांनी इनकम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना लोकांना आयकरात काही सूटही मिळते. काहीजण शेवटच्या तारखेपर्यंत आयकर भरू शकत नाहीत, अशांना पुढे दंडही भरावा लागू शकतो.

31 जुलै 2023 शेवटची तारीख

आयटीआर भरण्याची अंतिम तारीख असते. यावेळी तुम्ही 31 जुलै 2023 पर्यंत आयकर रिटर्न भरू शकता. त्यानंतर आयकर विवरणपत्र भरल्यास दंड आकारला जाऊ शकतो. तुमची ITR भरण्याची अंतिम मुदत चुकली तर? तुम्ही देय तारखेनंतर तुमचे रिटर्न भरल्यास, तुम्हाला न भरलेल्या कराच्या रकमेवर कलम 234A अंतर्गत 1% दरमहा किंवा काही महिन्याच्या दराने व्याज द्यावे लागेल.

तसेच, कलम 234F अंतर्गत 5000 रुपये विलंब शुल्क भरावा लागेल. जर एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर ही रक्कम 1,000 रुपयांपर्यंत कमी केली जाते. याशिवाय शेअर बाजार, म्युच्युअल फंड, मालमत्ता किंवा तुमच्या कोणत्याही व्यवसायात नुकसान झाले असेल, तर तुम्ही आयकर पुढील वर्षाच्या उत्पन्नात जोडू शकता. जर तुम्ही तुमच्या ITR मध्ये तोटा घोषित केला आणि अंतिम मुदतीपूर्वी तो आयकर विभागाकडे दाखल केला, तरच लॉस सेट ऑफला परवानगी दिली जाते.

विलंबित रिटर्न्स
दुसरीकडे, जर तुमची आयटीआर भरण्याची देय तारीख चुकली असेल, तर तुम्ही देय तारखेनंतर रिटर्न फाइल करू शकता, ज्याला विलंबित रिटर्न म्हणतात. यातही तुम्हाला विलंब शुल्क आणि व्याज भरावे लागेल. आयकर विभागाने विलंबित रिटर्न भरण्याची अंतिम तारीख देखील सांगितली आहे.  या वर्षासाठी तुम्ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत लेट रिटर्न भरू शकता.

 

Web Title: Income Tax Return: ITR Filing: Income Tax Return; 5 thousand fine will be charged after due date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.