Join us

Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 3:35 PM

Income Tax Return : Income Tax Return : जर तुम्ही नोकरी करत असाल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी तुमच्या कंपनीकडून फॉर्म-१६ दिला जातो. यात कर्मचाऱ्याला मिळणारा पगार आणि कंपनीनं पगारातून कापलेला कर याची माहिती दिली जाते.

Income Tax Return : जर तुम्ही नोकरी करत असाल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी तुमच्या कंपनीकडून फॉर्म-१६ दिला जातो. हा फॉर्म साधारणपणे मे महिन्यापर्यंत दिला जातो. यात कर्मचाऱ्याला मिळणारा पगार आणि कंपनीनं पगारातून कापलेला कर याची माहिती दिली जाते. कंपनीनं टीडीएस जमा केल्याची माहिती फॉर्म-१६ मधून मिळते. यात कंपनीचा टॅन नंबर, असेसमेंट इयर, कर्मचाऱ्याचा पॅन, पत्ता, पगाराचं विभाजन, करपात्र उत्पन्न आदींची माहिती असते. जर तुम्ही काही गुंतवणूक करत असाल आणि याची माहिती तुम्ही कंपनीला दिली असेल, तर त्याची माहितीही यात असते.

फॉर्म १६ नसेल तर काय? 

आयटीआर भरण्यासाठी फॉर्म-१६ नसेल तर वार्षिक माहिती विवरण (एआयएस) आणि फॉर्म २६ एएसनं देखील काम होऊ शकतं. या दोन्ही फॉर्ममध्ये करदात्यानं संपूर्ण आर्थिक वर्षात केलेले सर्व व्यवहार, मिळालेलं एकूण उत्पन्न, गुंतवणूक, कंपनीनं कापलेला टीडीएस यांची संपूर्ण माहिती असते. या माहितीच्या आधारे करदाते कोणतीही चूक न करता आयटीआर दाखल करू शकतात. आयकर विभागाच्या वेबसाइटवरून एआयएस आणि फॉर्म २६ एएस डाऊनलोड करता येतो. 

आपलं एआयएस कसं तपासावं? 

  • स्टेप १: आपलं एआयएस अॅक्सेस करण्यासाठी, www.incometax.gov.in वर आयकर ई-फाइलिंग पोर्टलवर लॉग इन करा. 'Services' टॅबद्वारे AIS (Annual Information Statement) पेजवर जा.
  • स्टेप २: 'Proceed' बटणावर क्लिक करा.
  • स्टेप ३: यानंतर तुम्ही कम्प्लायन्स पोर्टलवर रिडायरेक्ट व्हाल. तुम्ही एआयएस होम पेजवर टीआयएस एआयएस तपासू शकता.
  • स्टेप ४: आता संबंधित आर्थिक वर्ष निवडा, यानंतर तुम्ही टीआयएस किंवा एआयएस पाहू शकता.
टॅग्स :इन्कम टॅक्स