Join us

मुंबईतील Parle-G कंपनीच्या अनेक ठिकाणांवर आयकर विभागाचा छापा, सकाळपासून सुरु आहे तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 14:33 IST

Parle-G Income Tax Raid: मुंबईतील पार्ले समूहाच्या अनेक ठिकाणांवर आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती समोर आलीये. पार्ले ग्रुप ही पार्ले-जी, मोनॅको आणि इतर ब्रँड नावानं बिस्किटांची विक्री करणारी कंपनी आहे.

Parle-G Income Tax Raid: मुंबईतील पार्ले समूहाच्या अनेक ठिकाणांवर आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती समोर आलीये. पार्ले ग्रुप ही पार्ले-जी, मोनॅको आणि इतर ब्रँड नावानं बिस्किटांची विक्री करणारी कंपनी आहे. सकाळपासूनच मुंबईतील कंपनीच्या अनेक ठिकाणी आयकर विभागानं छापा टाकला. आयकर विभागाच्या फॉरेन अॅसेट्स युनिट आणि मुंबईच्या इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन विंगकडून हे छापे टाकण्यात आलेत.

परंतु हे छापे का टाकण्यात आलेत याची माहिती मात्र समोर आलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर याच्या कारणांचा खुलासा होऊ शकतो. सध्या आयकर विभागाकडून तपास सुरू असल्याची माहिती समोर आलीये.

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये वाढला नफा

सर्वप्रथम पारले-जीनं आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कमावलेल्या नफ्याबद्दल जाणून घेऊ. पीटीआयच्या वृत्तानुसार, आर्थिक वर्ष २०२३ मधील ७४३.६६ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये त्यांचा नफा दुप्पट होऊन १,६०६.९५ कोटी रुपये झाला आहे. पारलेचं ऑपरेशनल इन्कम २०१८-१९ मध्ये २ टक्क्यांनी वाढून १४,३४९.४ कोटी रुपये झालं. महसुलाबाबत बोलायचे झालं तर तो ५.३१ टक्क्यांनी वाढून १५,०८५.७६ कोटी रुपये झालं आहे. पार्ले बिस्किटाची मागणी अजूनही जोरदार असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येतं.

टॅग्स :इन्कम टॅक्सपार्ले-जीमुंबईधाड