Lokmat Money > बिझनेस न्यूज > Zerodha Nikhil Kamath : अपूर्ण शिक्षण, १४ व्या वर्षापासून कमाई; झिरोदाच्या या अब्जाधीश मालकावर चित्रपट बनवण्याची मागणी

Zerodha Nikhil Kamath : अपूर्ण शिक्षण, १४ व्या वर्षापासून कमाई; झिरोदाच्या या अब्जाधीश मालकावर चित्रपट बनवण्याची मागणी

बॉलिवूडमध्ये बायोपिक चित्रपटांचा ट्रेंड वाढत आहे. गेल्या काही वर्षात मेरी कोम, महावीर सिंह फोगट यांच्यासह अनेक व्यक्तिरेखा आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 03:27 PM2023-04-28T15:27:42+5:302023-04-28T15:31:26+5:30

बॉलिवूडमध्ये बायोपिक चित्रपटांचा ट्रेंड वाढत आहे. गेल्या काही वर्षात मेरी कोम, महावीर सिंह फोगट यांच्यासह अनेक व्यक्तिरेखा आहेत.

incomplete education started earning age of 14 years Demand to make a film on this billionaire owner of Zerodha nikhil kamath | Zerodha Nikhil Kamath : अपूर्ण शिक्षण, १४ व्या वर्षापासून कमाई; झिरोदाच्या या अब्जाधीश मालकावर चित्रपट बनवण्याची मागणी

Zerodha Nikhil Kamath : अपूर्ण शिक्षण, १४ व्या वर्षापासून कमाई; झिरोदाच्या या अब्जाधीश मालकावर चित्रपट बनवण्याची मागणी

बॉलिवूडमध्ये बायोपिक चित्रपटांचा ट्रेंड वाढत आहे. गेल्या काही वर्षात मेरी कोम, महावीर सिंह फोगट यांच्यासह अनेक व्यक्तिरेखा आहेत, ज्यांच्या बायोपिकनं बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम केले. आता गुंतवणूकदार आणि झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामथ यांच्या बायोपिकची मागणी होत आहे. निखिल कामथ यांचा जीवन प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा असल्याचे निर्मात्यांचे मत आहे.

सीनिअर ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, प्रेक्षकांना आता पडद्यावर वास्तविक जीवनातील नायक पाहायचे आहेत. स्ट्रगल करणारे सेल्फ मेड लोक प्रेक्षकांना आवडतात. निखिल कामथ यांच्या कथेत बायोपिक बनवण्यासाठी आवश्यक सर्वकाही आहे. निखिल कामथ यांची कथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी राजकुमार हिरानी, ​​नीरज पांडे किंवा राकेश ओमप्रकाश मेहरा हे उत्तम पर्याय असतील, असंही त्यांनी सांगितलं.

कसा होता प्रवास?
निखिल कामत यांचे वडील एक बँक कर्मचारी होते. त्यांचा मुलगा निखिल याला लहानपणापासूनच पैसे कमवण्याची ओढ होती. यामुळेच निखिल कामथ यांनी शाळा सोडली आणि वयाच्या १४ व्या वर्षी मोबाईल विकायला सुरुवात केली. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी कॉल सेंटरमध्ये काम केलं. यानंतर त्यांनी  लॉन्ड्रीशिवाय मेडिकल स्टोअरही चालवलं. यादरम्यान तो गुंतवणूकीबाबतही अभ्यास केला.

फोर्ब्सच्या यादीत नाव
१८ व्या वर्षी त्यांनी गुंतवणूकीवर लक्ष देण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. आज शेअर बाजारातील तज्ज्ञ आणि झिरोदाचे सह-संस्थापक म्हणून त्यांची ओळख आहे. ३६ वर्षीय कामथ यांना फोर्ब्सनं तीन वेळा सेल्फ मेड बिलेनियरच्या यादीत स्थान दिलं.

Web Title: incomplete education started earning age of 14 years Demand to make a film on this billionaire owner of Zerodha nikhil kamath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.