Lokmat Money > बिझनेस न्यूज > छोट्या नोटांची मागणी वाढल्याने रोखीतही वाढ

छोट्या नोटांची मागणी वाढल्याने रोखीतही वाढ

कमी दर्शनी मूल्याच्या नोटांची मागणी वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे प्रमाण वाढले आहे. चलनातील रोखीचे प्रमाण वाढल्याचा अर्थ बेहिशेबी पैसा वाढला, असा होत नाही, असा निष्कर्ष स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) जारी केलेल्या एका अहवालात काढण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 12:54 AM2019-02-16T00:54:34+5:302019-02-16T00:54:45+5:30

कमी दर्शनी मूल्याच्या नोटांची मागणी वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे प्रमाण वाढले आहे. चलनातील रोखीचे प्रमाण वाढल्याचा अर्थ बेहिशेबी पैसा वाढला, असा होत नाही, असा निष्कर्ष स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) जारी केलेल्या एका अहवालात काढण्यात आला आहे.

 The increase in cash increases by demand for small notes | छोट्या नोटांची मागणी वाढल्याने रोखीतही वाढ

छोट्या नोटांची मागणी वाढल्याने रोखीतही वाढ

मुंबई : कमी दर्शनी मूल्याच्या नोटांची मागणी वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे प्रमाण वाढले आहे. चलनातील रोखीचे प्रमाण वाढल्याचा अर्थ बेहिशेबी पैसा वाढला, असा होत नाही, असा निष्कर्ष स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) जारी केलेल्या एका अहवालात काढण्यात आला आहे.
एचएसबीसीने जारी केलेल्या एका अहवालानुसार, भारतात चलनात असलेली रोख रक्कम जानेवारी, २0१८ मध्ये २0.६५ लाख कोटी रुपये होती. हा सार्वकालिक उच्चांक आहे. नोटाबंदीच्या आधी चलनातील रोखीचे प्रमाण १७.९७ लाख कोटी रुपये होते. बेहिशेबी आर्थिक व्यवहार म्हणजेच काळा पैसा वाढल्यामुळे चलनातील रोखीचे प्रमाण वाढले आहे, असे एचएसबीसीने म्हटले आहे. काळा पैसा २ हजारांच्या नोटांत साठविला जात असल्याचे बोलले जात होते. (वृत्तसंस्था)

२ हजारांच्या नोटांचे प्रमाण अपुरे
एसबीआयने जारी केलेल्या ताज्या अहवालात मात्र काळ््या पैशाची शक्यता फेटाळून लावण्यात आली आहे. एसबीआयचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौम्यकांती घोष यांनी सांगितले की, वास्तविक चलनातील २ हजारांच्या नोटांचे प्रमाण अपुरे आहे. २ हजारांच्या नोटांची छपाईही सरकारने बंद केल्याचे मानले जात आहे.
मोठ्या रकमेच्या नोटा नसल्यामुळे छोट्या नोटांची मागणी वाढली आहे. याचा परिणाम म्हणून रक्कम तेवढीच असली तरी आर्थिक व्यवहारांत वाढ झाली आहे. एसबीआयच्या अहवालानुसार, १८ जानेवारी रोजी चलनातील रोख रकमेचे मूल्य २0.४ लाख कोटी रूपये होते.

Web Title:  The increase in cash increases by demand for small notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :SBIएसबीआय