Join us

खासगी बँकांमध्ये विदेशी हिस्सेदारी वाढविली!

By admin | Published: May 14, 2016 2:13 AM

रिझर्व्ह बँकेने बेसल-३ नियमांच्या अनुरूप व्यावसायिक बँकांच्या वाढत्या भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी खासगी बँकांत विदेशी बँकांच्या हिस्सेदारीची मर्यादा वाढवून ७४ टक्क्यांपर्यंत केली आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँकेने बेसल-३ नियमांच्या अनुरूप व्यावसायिक बँकांच्या वाढत्या भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी खासगी बँकांत विदेशी बँकांच्या हिस्सेदारीची मर्यादा वाढवून ७४ टक्क्यांपर्यंत केली आहे.रिझर्व्ह बँकेने गुरुवारी रात्री याबाबत दिशानिर्देश जारी केले. त्यातच खासगी बँकांत विदेशी बँकांच्या हिस्सेदारीची मर्यादा निश्चित केली. त्यानुसार सध्याच्या विदेशी गुंतवणुकीच्या धोरणानुसार खासगी बँकांत विदेशी बँका ७४ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. मात्र त्यात २६ टक्के हिस्सेदारी अनिवासी भारतीयांकडे असली पाहिजे ही अट आहे. विदेशी बँका इक्विटी शेअरच्या जास्तीतजास्त १० टक्क्यांपर्यंत अधिग्रहण करू शकतात. विशिष्ट परिस्थितीत ही मर्यादा वाढविली जाऊ शकते. खासगी बँकांत व्यक्तिगत हिस्सेदारीची मर्यादा १० टक्के, गैर वित्तीय संस्थांची १० टक्के, गैर नियमित व असूचीबद्ध वित्तीय संस्थांची १५ टक्के आणि नियमित व सूचीबद्ध संस्थांची हिस्सेदारी ४० टक्क्यांपर्यंत होऊ शकते. विशेष अनुमतीतहत निवडक बँकांसाठी यापूर्वी वाढविण्यात आलेल्या मर्यादेवर या नवीन दिशा-निर्देशाचा काहीही परिणाम होणार नाही, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.