नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्रालयाने सप्टेंबर महिन्यातील जीएसटीआर- ३बी विक्री रिटर्न भरण्याची अंतिम तारीख पाच दिवसांनी वाढवून २५ आॅक्टोबर केली आहे. त्यामुळे जुलै २०१७ ते मार्च २०१८ या काळात इनपुट टॅक्स के्रडिटचा (आयटीसी) दावा करणारे व्यवसायिकही आयटीसीचा २५ आॅक्टोबरपर्यंत दावा करू शकतात.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क बोर्डाने (सीबीआयसी) व्यावसायिकांना हा दिलासा दिला आहे. महिन्याचा जीएसटीआर-३बी त्यापुढील महिन्याच्या २० तारखेपर्यंत दाखल करायचा असतो. सप्टेंबर महिन्याचा जीएसटीआर- ३ बी रिटर्न दाखल करण्याचा कालावधी या आधी २० आॅक्टोबर होता.
जीएसटी रिटर्न दाखल करण्याच्या मुदतीत वाढ
केंद्रीय अर्थमंत्रालयाने सप्टेंबर महिन्यातील जीएसटीआर- ३बी विक्री रिटर्न भरण्याची अंतिम तारीख पाच दिवसांनी वाढवून २५ आॅक्टोबर केली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 02:55 AM2018-10-22T02:55:11+5:302018-10-22T02:55:17+5:30