नवी दिल्ली : महागाईच्या दरात काही प्रमाणात घट झाली असली तरीही आयात वाढत असल्यामुळे चिंता कायम आहे. त्यातही खाद्यतेलांची आयात माेठ्या प्रमाणात हाेत असल्यामुळे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचा कस लागणार आहे. मात्र, जमेची बाब म्हणजे चालू आर्थिक वर्षात निर्यात १२.५५ टक्क्यांनी वाढली आहे. हा देशातील औद्याेगिक स्थितीच्या दृष्टिकाेनातून चांगला संकेत आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टाेबरमध्ये देशाची आयात ५६.६९ अब्ज डाॅलर्स एवढी हाेती. तर निर्यात २९.७८ अब्ज डाॅलर्स एवढी झाली. ऑक्टाेबरमध्ये देशाचा व्यापारी ताेटा वाढून १७३ अब्ज डाॅलर्स एवढा झाला आहे. निर्यातीच्या तुलनेत आयात जास्त झाल्यामुळे व्यापारी तूट वाढली आहे.२६३.३५ अब्ज डाॅलर्स निर्यात४३६.८१ अब्ज डाॅलर्सवर आयात खाद्यतेलाची आयात वाढलीदेशातील खाद्यतेलाची आयात वाढली आहे. ऑक्टाेबर २०२२ला संपलेल्या वर्षात एकूण आयात ३४ टक्के वाढून १.५७ लाख काेटी रुपये एवढी झाली. या वर्षभरात १४०.३ लाख टन खाद्यतेलाची आयात झाली. वजनाच्या बाबतीत ही वाढ ६.८५ टक्के एवढी आहे. रुपयाचे मूल्य घसरल्यामुळे ही आयात महाग झाली. पामतेलाची आयात काही प्रमाणात घटून ७९ लाख टन एवढी झाली आहे. साेयाबीनने टाकले चिंतेत साेयाबीन तेलाची आयात यावर्षी झपाट्याने वाढली आहे. यावर्षी ४१.७१ लाख टन एवढे साेयाबीन तेल आयात झाले आहे. गेल्या वर्षी हा आकडा २८ लाख टन हाेता. इतर तेलाचीही आयात वाढली आहे.
तेल लावणार ‘चुना’, आयातवृद्धीने व्यापारी ताेट्यातही पडली भर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 6:32 AM