Join us

स्पाइसजेटच्या अडचणीत वाढ! कंपनी कमी फंडामुळे कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नाही, शेअर्स कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 3:58 PM

स्पाइसजेट कंपनी गेल्या काही दिवसापासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

स्पाइसजेट कंपनी गेल्या काही दिवसापासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कंपनीने गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नाही. यामुळे आता कंपनी कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा विचार करत आहे. दरम्यान, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ७५ टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आला आहे आणि पेन्शन फंडाची थकबाकी नजीकच्या भविष्यात जमा केली जाईल.

शेअर बाजारातही याचा परिणाम दिसला. आज १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १:५० वाजता, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर कंपनीचे शेअर्स ४.२४ टक्क्यांनी घसरून ६२.८५ रुपयांवर व्यवहार करत होते. एअरलाइनला रोख रकमेचा सामना करावा लागत आहे. भाड्याने विमाने उपलब्ध करून देणाऱ्या अनेक कंपन्या स्पाईसजेटला विमानासाठी मुदतवाढ देण्याबाबत संभ्रमात आहेत. एअरलाइनकडे अशी किमान ८ कार्यरत विमाने आहेत, त्यांची भाडेपट्टी मार्च २०२४ मध्ये संपणार आहे. या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण न केल्यास मार्चअखेरीस स्पाईसजेटची ३५ विमाने सुरू होणार नाहीत. 

सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद, आयटी आणि फार्मा शेअर्सना अमेरिकेतील महागाईचा फटका

मात्र, या संकटावर काहीतरी तोडगा निघेल, असा विश्वास विमान कंपनीला आहे. विमान कंपनीकडे एकूण ४२ विमाने भाडेतत्त्वावर आहेत, यात मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांचाही समावेश आहे.  स्पाइसजेट येत्या काही दिवसांत किमान १,४०० कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा विचार करत आहे. विमान कंपनीने हा निर्णय घेतला आहे कारण ती खर्च कमी करण्याच्या दिशेने आणि कमी होत चाललेल्या विमानांच्या ताफ्याचे कामकाज सुव्यवस्थित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असं सागण्यात येत आहे.

आर्थिक संकट, कायदेशीर लढाई आणि इतर प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत एअरलाइन कंपनी आणखी कर्मचाऱ्यांना कंपनी सोडण्यास सांगू शकते. मात्र, किती जणांना कामावरून कमी केले जाणार याबाबतचा अंतिम निर्णय या आठवड्यात घेतला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :विमानव्यवसाय