Lokmat Money > बिझनेस न्यूज > इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली

इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाल्यामुळे डिसेंबर २0१६ मध्ये ठोक क्षेत्रातील महागाईचा दर वाढून ३.३९ टक्के झाला.

By admin | Published: January 17, 2017 05:37 AM2017-01-17T05:37:35+5:302017-01-17T05:37:35+5:30

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाल्यामुळे डिसेंबर २0१६ मध्ये ठोक क्षेत्रातील महागाईचा दर वाढून ३.३९ टक्के झाला.

Increase in inflation due to fuel prices | इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली

इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली


नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ झाल्यामुळे डिसेंबर २0१६ मध्ये ठोक क्षेत्रातील महागाईचा दर वाढून ३.३९ टक्के झाला. महागाईतील घसरणीचा कल त्यामुळे उलट दिशेने फिरला आहे. भाजीपाला स्वस्त झाल्याचा परिणामही मर्यादित झाला आहे.
वस्तू उत्पादन क्षेत्रातील किमतीही वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणावर होईल. ८ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण आढावा जाहीर केला जाणार आहे. त्यात व्याजदर कपातीची शक्यता आता कमी झाली आहे.
घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये ३.१५ टक्क्यांवर होता. तसेच डिसेंबर २0१५ मध्ये उणे (-) १.0६ टक्के होता. तो डिसेंबर २0१६ मध्ये ३.३९ टक्के झाला. डिसेंबरमधील महागाईचा वाढता कल असताना भाजीपाल्याच्या किमती मात्र घसरून उणे (-) ३३.११ टक्के झाला. कांद्याचे दर उणे (-) ३७.२0 टक्के झाले. कांद्याच्या किमतीतील प्रचंड घसरणीमुळे भाजीपाल्याच्या एकूण निर्देशांकाने घसरण दर्शविली. भाजीपाल्याच्या किमती इतक्या घसरल्या आहेत की, तो बाजारात नेण्यासाठी लागणारा वाहतुकीचा खर्चही विक्रीतून निघेनासा झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली.
जाणकारांनी सांगितले की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ झाल्याने देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. असोचेमने म्हटले की, गेल्या एक महिन्यापासून कच्च्या तेलाच्या किमती सतत वाढत राहिल्या.
>इंधनाच्या किमती डिसेंबरमध्ये वाढल्या
डिसेंबरमध्ये डिझेलच्या किमती २0.२५ टक्क्यांनी, तर पेट्रोलच्या किमती ८.५२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून इंधन आणि ऊर्जा क्षेत्राचा एकूण महागाईचा दर वाढून ८.६५ टक्क्यांवर गेला.
इंधनाशिवाय साखर, बटाटे,
डाळी आणि गव्हाच्या किमतीतही वाढ झाली. एकूण खाद्य क्षेत्राचा महागाई निर्देशांक मात्र घसरला आहे.
नोव्हेंबरमध्ये १.५४ टक्क्यांवर असलेला हा निर्देशांक डिसेंबरमध्ये उणे (-) 0.७0 टक्क्यांवर आला.

Web Title: Increase in inflation due to fuel prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.