Join us

इन्फोसिसच्या नफ्यामध्ये वाढ

By admin | Published: October 15, 2016 1:24 AM

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसचा सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीतील एकीकृत शुद्ध नफा ६.१ टक्क्यांनी वाढून ३,६0६ कोटी रुपये

बंगळुरू : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसचा सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीतील एकीकृत शुद्ध नफा ६.१ टक्क्यांनी वाढून ३,६0६ कोटी रुपये झाला. वस्तुत: चालू आर्थिक वर्षात कंपनीच्या उत्पन्नात अंदाजापेक्षा दुसऱ्यांदा घट झाल्याचे दिसत आहे.इन्फोसिसने एक निवेदन जारी करून जुलै-सप्टेंबर या काळातील कामगिरीचा तपशील जाहीर केला. या काळात कंपनीचा एकीकृत नफा ३,६0६ कोटी रुपये राहिला. गेल्या वर्षीच्या समान तिमाहीत तो ३,३९८ कोटी रुपये होता. कंपनीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, ३१ मार्चपर्यंत डॉलर मूल्यात कंपनीच्या विक्रीत ७.५ ते ८.५ टक्के वाढ होईल. जुलैत कंपनीने १0 टक्के वाढीचा अंदाज मांडला होता. त्याआधी एप्रिलमध्ये २0१६-१७मधील उत्पन्नात ११.५ टक्के वाढ होईल, असा कंपनीचा अंदाज होता. चालू आर्थिक वर्षात स्थिर चलन मूल्यावर आपले उत्पन्न ८ ते ९ टक्क्यांनी वाढेल, असे कंपनीला वाटते.नास्कॉमने आयटी क्षेत्रातील निर्यातीत १0 ते १२ टक्के वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. याचाच अर्थ इन्फोसिसचा स्वत:चा अंदाज नास्कॉमपेक्षा २ ते ३ टक्क्यांनी कमी आहे. (वृत्तसंस्था)