नवी दिल्ली : व्याजदर वाढल्याने ईएमआय वाढला आहे. असे असतानाही जानेवारी - मार्च २०२३ या तिमाहीत गृहकर्जाची मागणी यापूर्वीच्या तिमाहीच्या तुलनेत ४२ टक्के वाढली. जानेवारी - मार्च २०२२ च्या तुलनेत ही वाढ तब्बल १२० टक्के आहे. विशेष म्हणजे, तरुणांनी घर खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.
वर्षभरात २.५ टक्के व्याजदर वाढमे २०२२ पासून आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने रेपो दर २.५० टक्के वाढविला. त्यामुळे गृहकर्जाचा सरासरी व्याज दर ९ टक्के झाला. एक वर्ष आधी तो ६.५ टक्के होता. देशातील सर्वांत मोठी बँक एसबीआयचा व्याजदर ८.५० टक्के आहे.
या घरांना पसंती (रु.) ४५ लाखांपर्यंत २९% ४५-९० लाखांपर्यंत ३२% ९० लाख-१.५ काेटी २६% १.५-२.५ काेटी ९% २.५ काेटी+ ४% लाेकांची गुंतवणूक कुठे? रिअल इस्टेट ६१% शेअर बाजार २६% बॅंक एफडी ८% साेने-चांदी ५% तरुणाईला हवे स्वत:चे घर २१-२६ वर्षे ५२% २७-४२ वर्षे ११% ४३-५९ वर्षे ३०% ज्येष्ठ नागरिक ७%
काय आहे सर्वेक्षणातील माहिती?
७८%लोक म्हणतात गृहकर्जाचा सध्याचा व्याज दर जास्त महाग व स्वस्त नाही.
६३%टक्के लोक घर खरेदी करू इच्छितात.
४९%प्रमाण कोविडच्या आधी होते.
२७%२५ ते ३५ वयाच्या लाेकांनी घेतलेमार्च तिमाहीत घरासाठी कर्ज.