Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोटाबंदीनंतर वाढ : बनावट नोटांवर लगाम नाही; दिल्ली, गुजरातमध्ये पकडल्या सर्वाधिक

नोटाबंदीनंतर वाढ : बनावट नोटांवर लगाम नाही; दिल्ली, गुजरातमध्ये पकडल्या सर्वाधिक

बनावट नोटांवर लगाम लावण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय योग्य असल्याचा दावा सरकार भलेही करत असेल, पण बोगस नोटांचा सिलसिला केवळ सुरूच नसून, त्यात वाढही झाली आहे. ज्या राज्यांत सर्वाधिक नकली नोटा पकडल्या गेल्या आहेत त्यात दिल्ली, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:20 AM2017-12-21T00:20:38+5:302017-12-21T00:21:03+5:30

बनावट नोटांवर लगाम लावण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय योग्य असल्याचा दावा सरकार भलेही करत असेल, पण बोगस नोटांचा सिलसिला केवळ सुरूच नसून, त्यात वाढही झाली आहे. ज्या राज्यांत सर्वाधिक नकली नोटा पकडल्या गेल्या आहेत त्यात दिल्ली, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

Increase in the postpone: There is no rein on fake notes; Most caught in Delhi, Gujarat | नोटाबंदीनंतर वाढ : बनावट नोटांवर लगाम नाही; दिल्ली, गुजरातमध्ये पकडल्या सर्वाधिक

नोटाबंदीनंतर वाढ : बनावट नोटांवर लगाम नाही; दिल्ली, गुजरातमध्ये पकडल्या सर्वाधिक

नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : बनावट नोटांवर लगाम लावण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय योग्य असल्याचा दावा सरकार भलेही करत असेल, पण बोगस नोटांचा सिलसिला केवळ सुरूच नसून, त्यात वाढही झाली आहे. ज्या राज्यांत सर्वाधिक नकली नोटा पकडल्या गेल्या आहेत त्यात दिल्ली, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत १८.८० कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या २.६६ लाख नकली नोटा जप्त करण्यात आल्या. यात अंदमान, निकोबार, दादरा नागर हवेली, चंदीगड, दमन व दीव, झारखंड, लक्षव्दीप, मेघालय, सिक्कीम आणि त्रिपुरामध्ये पकडण्यात आलेल्या नकली नोटांची माहिती नाही. आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये १६.५५ कोटी रुपये मूल्याच्या २.९० लाख नोटा पकडण्यात आल्या आहेत.
यावर्षी दिल्लीत सर्वाधिक म्हणजे १,०५,७१२ बनावट नोटा पकडण्यात आल्या. त्यांचे मूल्य ६.४८ कोटी रुपये होते. गुजरातमध्ये ४.४१ कोटी मूल्याच्या ५७,५१० नोटा, केरळात १.२३ कोटींच्या १७,७६६ नोटा, आंध्र प्रदेशात ५९ लाख रुपये किमतीच्या १५,२७६ आणि उत्तर प्रदेशात १.३७ कोटी मूल्याच्या १३,३६८ नोटा जप्त करण्यात आल्या.
पहिल्या ११ महिन्यांत बनावट नोटाप्रकरणी ६५८ एफआयआर दाखल झाले आणि ६८८ लोक दोषी आढळून आले. यातील सर्वाधिक ९४ प्रकरणे उत्तर प्रदेशमधील आहेत. यात ६४ जण दोषी आढळले. गुजरातमध्ये ६६ प्रकरणे दाखल करण्यात आली. पण, येथे अन्य राज्यांच्या तुलनेत ८७ व्यक्ती जण आढळून आले.
अहीर यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे की, यावर्षी पकडण्यात आलेल्या नोटात सर्वाधिक ५०० रुपयांच्या ८९,८३८, १०० रुपयांच्या ७२,६८१, १००० रुपयांच्या ६६,२८४ आणि २००० रुपयांच्या ३४,७२८ नोटा जप्त करण्यात आल्या. गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी चलनात आल्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत २००० रुपयांच्या ३१९९ नकली नोटा पकडण्यात आल्या. यात सर्वात जास्त १३०० नोटा गुजरातमध्ये पकडण्यात आल्या. ५०० रुपयांच्या १.३७ लाख नकली नोटा तिथे जप्त करण्यात आल्या.
गृह राज्यमंत्र्यांनी दावा आहे की, नोटाबंदीनंतर उच्च गुणवत्तेच्या कोणत्याही नकली नोटा सापडल्या नाहीत. ज्या नोटा जप्त केल्या आहेत, त्या स्कॅन वा फोटोकॉपी आहेत. बनावट नोटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांच्या विविध एजन्सींच्या समन्वयाद्वारे भारतीय करन्सी नोट समन्वय समूह आणि राष्ट्रीय गुप्तचर संस्थेत एक विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.
नकली नोटांची तस्करी रोखण्यासाठी बांग्लादेशाशी करार झाला आहे आंतरराष्ट्रीय सीमेवरही अधिक लक्ष ठेवण्यात येत आहे.

Web Title: Increase in the postpone: There is no rein on fake notes; Most caught in Delhi, Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.