Join us

निवडणूक वर्षात शेतमालाचे भाव वाढविणार; शेतकऱ्यांना खूश करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 4:54 AM

हे निवडणुकांचे वर्ष असल्यामुळे शेतक-यांना खूश करण्याची तयारी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चालविली आहे. यंदा खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतींत सर्वांत मोठी वाढ करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : हे निवडणुकांचे वर्ष असल्यामुळे शेतक-यांना खूश करण्याची तयारी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चालविली आहे. यंदा खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतींत सर्वांत मोठी वाढ करण्यात येणार आहे. भाताच्या किमान आधारभूत किमतीत प्रतिक्लिंटल तब्बल २०० रुपयांची वाढ केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारने २००८-०९ वित्तवर्षात किमान आधारभूतकिमतीत १५५ रुपयांची घसघशीत वाढ केली होती. २००९च्यालोकसभा निवडणुकीत त्याचासंपुआ सरकारला फायदा झाला होता.हाच फॉर्म्युला मोदी सरकार वापरणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान यासह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर लोकसभा निवडणुकांचे वेध लागतील. २०१४च्या निवडणकीआधी मनमोहन सिंग सरकारने शेतमालाच्या किमान आधारभूत किमतींत फार मोठी वाढ केली नव्हती. या निवडणुकीत त्यांना फटका बसून त्यांचे सरकारच गेले होते, हे विशेष.सूत्रांनी सांगितले की, यंदा भाताला १,७५० रुपयांचा भाव मिळण्याची शक्यता आहे. तूर, मूग, उडीद या डाळींच्या किमान आधारभूत किमतींत प्रति क्विंटल किमान २०० रुपयांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. मुगाच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ केली जाऊ शकते.सूत्रांनी सांगितले की, किमान आधारभूत किमतींत १.५ टक्के वाढ करण्याचे वचन सरकारने अर्थसंकल्पात दिले होते. त्यासाठी १५ हजार कोटी रुपये खर्च करण्याची सरकारची तयारी आहे.भात, अन्नधान्ये आणि काही डाळी यांच्या किमतींत वाढ केली जाणार आहे. खरीप आणि रब्बीअशा दोन्ही हंगामांसाठी सरकार दरवर्षी किमान आधारभूत किमती घोषित करते.उसाच्या दरातही वाढ अपेक्षितउसाच्या किमान आधारभूत किमतीतही वाढ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या शनिवारी खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच उसाचा भाव दोन आठवड्यांत वाढविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन मोठ्या राज्यांत ऊस उत्पादक शेतकरी आहेत.

टॅग्स :शेतकरी