नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असतानाच मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. या वाढीचा परिणाम आणखी काही वस्तूंच्या भाववाढीवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जगभरात कच्च्या तेलाच्या किमती दिवसेंदिवस कमी होत असताना भारतात मात्र उत्पादन शुल्कात वाढ केल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
शनिवारी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ केली. पेट्रोल १ रुपया प्रती लीटर, तर डिझेलमध्ये दीड रुपया प्रती लीटर अशी वाढ करण्यात आली. सरकारने महिनाभरात तिसऱ्यांदा उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. या उत्पादन शुल्क वाढीनंतर सरकारच्या तिजोरीत ३ हजार दोनशे कोटी रुपयांची भर पडणार आहे, तर तीन महिन्यात सरकारला १७ हजार कोटी रुपये मिळणार आहेत.
गेल्या काही महिन्यात सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात केलेली वाढ....