नवी दिल्ली : शेअर बाजारात तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये मोबाईलद्वारे होणारे कामकाज गेल्या वर्षी तीनपट वाढले, तर इंटरनेटद्वारे होणाऱ्या कामकाजात ५२ टक्क्यांची वाढ झाली.नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने दिलेल्या माहितीनुसार २०१४ मध्ये मोबाईलवर रोज १५६ कोटी रुपयांचे व्यवहार झाले, तर २०१३ मध्ये ६४ कोटींचे होते. एनएसईमध्ये इंटरनेटद्वारे रोज होणारे व्यवहार २०१४ मध्ये ५२ टक्क्यांनी वाढून १,८३६ कोटी रुपयांचे झाले तर त्याआधीच्या वर्षी ते १,२०६ कोटी रुपयांचे होते. एनएसईने सांगितले की २०१४ मध्ये इंटरनेटद्वारे व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांचे प्रमाण १७ टक्के होते, तर मोबाईलद्वारे व्यवहार करणाऱ्यांच्या संख्येत १०१ टक्क्यांची वाढ झाली. डिसेंबर २०१४ मध्ये मोबाईलद्वारे ४,३१३.०६ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. त्याआधीच्या वर्षी तेच १,७४३.६१ कोटी रुपयांचे होते. २०१२ मध्ये हेच व्यवहार ९५७.४७ कोटी रुपयांचे होते. २०१० मध्ये मोबाईलद्वारे या प्रकारच्या कामकाजाला सुरुवात झाली.
मोबाईल, इंटरनेटद्वारे शेअर व्यवहार वाढले
By admin | Published: February 09, 2015 11:54 PM