Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारात केली निगराणी प्रणालीत वाढ

शेअर बाजारात केली निगराणी प्रणालीत वाढ

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीला पराभवाचा सामना करावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात हेराफेरी तसेच संभाव्य चढ-उतार

By admin | Published: November 9, 2015 12:31 AM2015-11-09T00:31:29+5:302015-11-09T00:31:29+5:30

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीला पराभवाचा सामना करावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात हेराफेरी तसेच संभाव्य चढ-उतार

Increase in the Stock Market Market Monitor System | शेअर बाजारात केली निगराणी प्रणालीत वाढ

शेअर बाजारात केली निगराणी प्रणालीत वाढ

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीला पराभवाचा सामना करावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात हेराफेरी तसेच संभाव्य चढ-उतार रोखण्यासाठी सेबी आणि शेअर बाजारांनी निगराणी व जोखीम व्यवस्थापन प्रणालीत वाढ केली आहे.
बिहारात भाजपाच्या पराभवामुळे नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या भविष्यावर परिणाम होण्याचा धोका आहे. त्यामुळे बाजारात मोठे चढ-उतार होण्याचा धोका आहे. याचा गैरफायदा घेऊन बाजारात हेराफेरी होण्याचा धोकाही आहे. याशिवाय कृत्रिमरीत्या बाजारात चढ-उतार केले जाण्याचाही धोका आहे. या पार्श्वभूमीवर सेबी सक्रिय झाली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शेअर बाजारातील व्यवहारांवर निगराणी प्रणालींचे बारीक लक्ष असेल. बीएसईचे सीईओ आशिष कुमार यांनी सांगितले की, बीएसईची निगराणी प्रणाली आणि जोखीम व्यवस्थापन प्रणाली किमतींतील कृत्रिम चढ-उतार रोखण्यास समर्थ आहे.

Web Title: Increase in the Stock Market Market Monitor System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.