नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीचा उद्रेक झाल्यानंतर भारतातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरात तब्बल ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. हे प्रमाण इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातील या काळातील वाढ अमेरिकेत ३५ टक्के, ब्रिटनमध्ये २३ टक्के आणि जपानमध्ये २८ टक्के राहिली.
‘पीडब्ल्यूसी’ने जारी केलेल्या अहवालानुसार, कोविड-१९ साथीच्या काळात भारतातील व्यवसाय व संस्थांनी विविध प्रकारच्या कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा स्वीकार केला. साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भारतीय वस्तू उत्पादन क्षेत्राने पारंपरिक मूल्य साखळीला स्वयंचलित साखळीत बदलून घेतले. नव्या परिस्थितीमुळे निर्माण केलेल्या समस्या सोडविण्यासाठी सरकारही तंत्रज्ञानासोबत संपर्क साधून आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
आणि कॉन्टॅक्टलेस थर्मल स्क्रीनिंग यावर मोठ्या प्रमाणात काम झाले आहे.
विद्यापीठे, स्टार्टअप्स आणि हेल्थ केअर क्षेत्रात रुग्णांना मदत करणे आणि विषाणू प्रसाराबाबत अंदाज बांधणे, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डायग्नोस्टिक गायडन्स सिस्टीम विकसित करण्यात आली. पीडब्ल्यूसी इंडियाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारतातील एआय वापर वाढण्यामागे संघटित प्रयत्न आहेत. गेल्या वर्षी सर्वेक्षणात सहभागी झालेल्या उद्यमींपैकी ६२ टक्के उद्यमींनी एआयचा स्वीकार केला होता. हे प्रमाण यदा ७० टक्क्यांवर गेले आहे.
हाॅटेल बुकिंगसाठी डिजिटल माध्यमांचा वापर
ओयो रूम्सचे सीईओ रितेश अग्रवाल यांनी टीआयई ग्लोबल वेबिनारमध्ये या संदर्भात सविस्तर माहिती देताना सांगितले की, येणाऱ्या काळात
प्रवास, पर्यटन आणि आतिथ्य या क्षेत्रांत डाटा सायन्स, बिग डाटा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हॉटेल बुकिंगसाठी डिजिटल माध्यमांचा अधिक वापर होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात वाढ, विविध व्यवसाय संस्थांनी केला साधनांचा स्वीकार
artificial intelligence : कोरोना विषाणूच्या साथीचा उद्रेक झाल्यानंतर भारतातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरात तब्बल ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. हे प्रमाण इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 05:54 AM2020-12-12T05:54:28+5:302020-12-12T05:55:41+5:30