Join us

ज्वेलर्सकडून खरेदी वाढल्याने सोने तेजीत

By admin | Published: January 21, 2016 3:12 AM

लग्नसराईची मागणी पूर्ण करण्यासाठी ज्वेलर्सकडून झालेली खरेदी, तसेच जागतिक वाढीचा कल स्पष्ट झाल्यामुळे बुधवारी सोने प्रति दहा ग्रॅम ३४० रुपयांनी वधारून

नवी दिल्ली : लग्नसराईची मागणी पूर्ण करण्यासाठी ज्वेलर्सकडून झालेली खरेदी, तसेच जागतिक वाढीचा कल स्पष्ट झाल्यामुळे बुधवारी सोने प्रति दहा ग्रॅम ३४० रुपयांनी वधारून २६ हजार ६९० रुपये झाले. गेल्या दोन महिन्यांतील ही मोठी भाववाढ आहे. उद्योग, तसेच नाणी निर्मात्यांकडून मागणी आल्यामुळे चांदीही प्रति किलो ४०० रुपयांनी वाढून ३४ हजार ४०० झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्यामुळे सोन्याची आयात महागली, परिणामी सोने वाढले. ४ सप्टेंबर २०१३ पासून प्रथमच डॉलरचा भाव ६८ रुपयांवर गेला. बुधवारी ४२ पैसे वाढ नोंदवत तो ६८.०७ इतका झाला. सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोने प्रति औंस ११०० डॉलर्स झाले. शेअरचे भाव पडल्यामुळे दोन महिन्यांत सोन्याच्या खरेदीकडे कल वाढला आहे. राजधानीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्ध सोने बुधवारी ३४० रुपये वाढून अनुक्रमे २६ हजार ६९० व २६ हजार ५४० रुपये प्रति दहा ग्रॅम होते. यापूर्वी ३ नोव्हेंबर रोजी हा भाव होता. गेले दोन दिवस २०० रुपयांनी सोने उतरले होते. आज शुद्ध सोने १०० रुपयांनी वाढून प्रति ८ ग्रॅम २२ हजार ४०० रुपये झाले. सोन्याच्या धर्तीवर चांदीही ४०० रुपयांनी वाढून प्रति किलो ३४ हजार ४०० रुपये झाली, तर आठवड्याने डिलेव्हरी मिळणारी चांदी ३१४ रुपयांनी वाढून ३४ हजार ३६० रुपये झाली. शंभर चांदीच्या नाण्यांचा भाव खरेदीसाठी ४९ हजार, तर विक्रीस ५० हजार रुपये झाला.