Join us  

पाच वर्षांमध्ये वाढले अबकारी करांचे संकलन, कंपनी करांच्या संकलनात मात्र घट; सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 7:59 AM

excise tax: चार वर्षांमध्ये झालेले कर संकलन आणि सन २०२०-२१ मधील अंदाजे संकलन यांची माहिती केंद्र सरकारतर्फे लोकसभेमध्ये देण्यात आली.

नवी दिल्ली : चार वर्षांमध्ये झालेले कर संकलन आणि सन २०२०-२१ मधील अंदाजे संकलन यांची माहिती केंद्र सरकारतर्फे लोकसभेमध्ये देण्यात आली. या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांपासून कंपनी करांचे संकलन सातत्याने कमी हाेत असून अबकारी कराच्या माध्यमातून मिळणारा महसूल वाढू लागला आहे. प्राप्ती व संपत्तीकरापासून मिळणारे उत्पन्नही वाढताना दिसून येत आहे. सेवाकरापासून जमा होणारा महसूलही कमी-कमी होताना दिसत आहे.जुलै २०१७ मध्ये केंद्र सरकारने जीएसटी लागू केला. हा कर लागू करताना त्यामध्ये अनेक करांचा समावेश करण्यात आल्यामुळे अनेक सेवांवरील सेवा कर कमी झाला. याचा परिणाम त्यानंतर वर्षांमध्ये सेवा कराचे संकलन कमी कमी होत गेलेले दिसून आले आहे. काही काळ करेतर महसूल वाढलेलाही दिसून येत आहे.

टॅग्स :कर