Join us

चीनमध्ये वाढली बेरोजगारी

By admin | Published: October 27, 2015 11:14 PM

आर्थिक मंदीमुळे चीनमध्ये बेरोजगारी वाढली आहे. सरकारी आणि खासगी कंपन्यांतून कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे संकेत मिळत

बीजिंग : आर्थिक मंदीमुळे चीनमध्ये बेरोजगारी वाढली आहे. सरकारी आणि खासगी कंपन्यांतून कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे संकेत मिळत आहेत. मनुष्यबळ विकास आणि सामाजिक सुरक्षा मंत्रालयाचे प्रवक्ते ली झोंग यांनी सांगितले की, चीनमध्ये यावर्षी आतापर्यंत शहरी भागातील केंद्रांवर एक कोटी सहा लाख साठ हजार रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. सरकार एक कोटी आणखी संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे बेरोजगारीचा दर ४.५ टक्क्यांपेक्षा कमी राहील. या वर्षी पहिल्या तीन महिन्यांत रोजगाराच्या संधी सामान्य स्वरूपात आहेत. सप्टेंबरपर्यंत तीस हजार कंपनींच्या निरीक्षणात असे दिसून आले आहे की, नोकरीच्या संधी पाच टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.