नवी दिल्ली : देशात डिजिटायझेशनला (Digitization) चालना मिळाल्यामुळे रोख रक्कमऐवजी (cash transactions) ई-वॉलेट (e-wallets) आणि यूपीआयचा (UPI) वापर वाढला आहे. यामुळे नागरिकांना फक्त आर्थिक सेवा (financial services) मिळणे सोपे झाले नाही, तर त्यांच्या आर्थिक व्यवहार (financial transactions) करण्याच्या पद्धतीमध्येही बदल झाला आहे. लोक आता रोख रक्कम वापरून व्यवहार करण्याऐवजी ई-वॉलेट आणि यूपीआय वापरत आहेत.
'फिनटेक कंपन्यांच्या आगमनामुळे आर्थिक समावेशन झाले आहे. म्हणजेच अर्थ वित्तीय सेवांचा अधिक विस्तार झाला आहे. डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेतील रोख रक्कम वापरून व्यवहार करण्याचे प्रमाण कमी झाले आहे', असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांचे यासंदर्भात म्हणणे आहे.
'भारत डिजिटल पेमेंटमध्ये वेगाने समृद्ध होईल'
नीती आयोगाच्या फिनटेकसंबंधी शिखर परिषदेत बोलताना राजीव कुमार म्हणाले की, 'अधिक न्याय्य, समृद्ध आणि आर्थिक समावेशक भारत निर्माण करण्यासाठी डिजिटल पेमेंटला चालना देणे महत्त्वाचे आहे. भारतात डिजिटायझेशन वाढत आहे, आणि लोकांना आर्थिक सेवा सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारात बदल झाला आहे. आता ते रोख रक्कमेऐवजी ई-वॉलेट आणि यूपीआयचा वापर करत आहेत.'
यूपीआयसारखे व्यासपीठ तयार करण्यावर सरकारचा विश्वास
या परिषदेत बोलताना केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, 'सरकार आरोग्य, लॉजिस्टिक आणि इतर क्षेत्रांसाठी कोविन (COVIN) आणि यूपीआय (UPI) सारखे खुले व्यासपीठ तयार करण्यावर विश्वास ठेवते. सार्वजनिक गुंतवणुकीद्वारे असे एक खुले व्यासपीठ तयार करण्यात आले आहे, ज्यामुले अनेक खासगी उद्योजक, स्टार्टअप आणि डेव्हलपर्स नाविन्यपूर्ण गोष्ट करण्यासाठी एकत्र येऊ शकतात.'