नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करून वापरण्यासाठी इथेनॉलचे उत्पादन तिप्पट वाढविण्यात येणार असून, आगामी चार वर्षांत कच्च्या तेल आयातीवरील १२ हजार कोटी रुपये वाचविण्यात येतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले. इथेनॉल उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल, असेही ते म्हणाले.जागतिक जैव इंधन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी यांनी सांगितले की, देशात १२ बायो-रिफायनरीज उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पांवर तब्बल १० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. या प्रकल्पांतून कृषी कचरा आणि भुसा त्याचप्रमाणे शहरांतील कचरा यापासून इंधन बनविण्यात येईल. या जैव इंधनामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी होईल. पर्यावरण स्वच्छ होण्यासही त्यांची मदत होईल. शेतकºयांचे उत्पन्न वाढून ग्रामीण भागात रोजगाराची निर्मिती होईल.मोदी म्हणाले की, उसाचा भुसा आणि पिकांचा अवशिष्ट कचरा यामुळे केवळ शेतकºयांना अतिरिक्त उत्पन्नच मिळणार नाही, तर कृषी कचºयाची सुरक्षित विल्हेवाट लावण्याचा मार्गही मोकळा होईल.भारत हा जगातील तिसरा मोठा तेल वापरकर्ता देश आहे. मात्र, देशात वापरल्या जाणाºया कच्च्या तेलापैकी ८१ टक्के आयात केले जाते. त्यापोटी मोठे विदेशी चलन खर्च करावे लागते. जैव इंधनाचा पर्याय निर्माण केल्यास आयातीवरील भारताचे अवलंबित्व काही प्रमाणात कमी होईल.
इथेनॉलचे उत्पादन वाढवून १२,००० कोटी वाचविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 2:51 AM