मुंबई- कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, त्याला थोपवण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून, १७ मेनंतर पुढे लॉकडाऊन वाढणार का?, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीसुद्धा लॉकडाऊनवर भाष्य केलं आहे. लॉकडाऊन दीर्घ कालावधीसाठी वाढविण्यात आला तर देशाचं मोठं आर्थिक नुकसान होणार असून, अर्थव्यवस्थेसाठी ते आत्मघातकी पाऊल ठरेल, असंही आनंद महिंद्रा म्हणाले आहेत. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष म्हणाले की, लॉकडाऊनने लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत, पण जर यात आणखी वाढ केली तर समाजाच्या (गोरगरीब आणि गरजू) खालच्या स्तरातील वर्गाला गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
Coronavirus: लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 8:16 AM