नवी दिल्ली : सराफांकडून मागणी वाढल्यामुळे सोमवारी येथील बाजारात सोने २० रुपयांनी महाग होऊन १० गॅ्रमला २६,५७० रुपये झाले. मात्र चांदीला २०० रुपयांचा फटका बसून ती ३६ हजार रुपये किलो अशी घसरली.ग्रीसच्या नागरिकांनी त्यांच्या देशाला कर्ज देणाऱ्यांनी घातलेल्या जाचक अटी मान्य नसल्याचे सार्वमताद्वारे रविवारी स्पष्ट केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत सोन्याला मिळालेले स्थान आणि सराफांकडून वाढलेली मागणी सोन्याच्या भावावर सकारात्मक परिणाम करून गेली. देशातील सोन्याच्या भावावर बहुतेकवेळा सिंगापूरमधील बाजारपेठेचा परिणाम होतो. तेथील बाजारपेठेत सोन्याचा भाव औंसमागे ०.६ टक्क्यांनी वधारून १,१७५.४५ अमेरिकन डॉलर झाला. चांदी (रेडी) मात्र २०० रुपयांनी खाली येऊन किलोला ३६,००० रुपये तर वीकली बेसड् डिलिव्हरीची चांदी २७० रुपयांनी महाग होऊन ३५,९५० रुपये झाली. चांदीच्या १०० नाण्यांचा भाव खरेदीसाठी ५४,००० व विक्रीसाठी ५५,००० रुपये असा स्थिर होता.राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ आणि ९९.५ शुद्धतेच्या सोन्याचा भाव १० ग्रॅममागे २० रुपयांनी वाढून अनुक्रमे २६,५७० व २६,२४० रुपये झाला. शनिवारी सोने ५० रुपये वधारले होते. आठ ग्रॅमचे नाणे २३,३०० रुपये याच शेवटच्या भावावर स्थिर होते.
खरेदी वाढताच सोने महागले
By admin | Published: July 06, 2015 10:50 PM