नवी दिल्ली : सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपन्यांच्या विक्रीत मोठी वाढ झालेली असताना नफ्याचे प्रमाण मात्र घटले असल्याचे समोर आले आहे. कोविड-१९ साथीतून अर्थव्यवस्था सावरत असताना हा नवीन कल समोर येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उपलब्ध आकडेवारीनुसार, शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणच्या बाजारपेठांत मागणी वाढली आहे. त्यामुळे विक्रीला चालना मिळाली आहे. मोठ्या कंपन्यांचा बाजार हिस्सा वाढत चालला असून, असंघटित क्षेत्राचा विक्रीतील हिस्सा घटत चालल्याचे दिसून येत आहे.
सूत्रांनी सांगितले की, वाढलेल्या महागाईचा परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर झाला आहे. फार किमती वाढविल्यास विक्री घसरण्याच्या भीतीने अनेक कंपन्यांनी दरवाढ मर्यादित ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या नफ्यात घसरण झाली आहे. काही कंपन्यांनी विशेषत: बिगर जीवनावश्यक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांनी नफा टिकवून ठेवण्यासाठी किमतीत आवश्यक वाढ केली आहे. आगामी काळात मागणीत आणखी वाढ होईल, असे कंपन्यांना वाटते.
अल्ट्राटेकच्या व्यवस्थापनाने म्हटले की, वित्त वर्ष २०२२ च्या दुसऱ्या सहामाहीत मागणीत ६ ते ८ टक्के वाढ होऊ शकते.
प्राप्त माहितीनुसार, ज्युबिलंट फूडवर्कची वार्षिक आधारवरील विक्री ३९ टक्क्यांनी वाढली. टीव्हीएस मोटारच्या विक्रीत २२ टक्के वाढ झाली. एशियन पेंट्सच्या स्वतंत्र
(स्टँड-अलोक) महसुलात ३६ टक्के वाढ झाली आहे. जेएसडब्ल्यू स्टीलच्या एकत्रित विक्रीत ७१ टक्के वाढ झाली.
वाढलेला उत्पादनखर्च ग्राहकांच्या माथी
२०२ कंपन्यांच्या विक्रीत ३५ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या विक्रीत ५० टक्के वाढ झाली आहे. तथापि, सर्वच कंपन्यांना वाढलेला उत्पादन खर्च ग्राहकांच्या माथी मारणे जमलेले नाही. हॉवेल्सच्या नफ्यात घट झाल्याचे दिसून आले आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या सकळ नफ्यात तिमाहीत १४० आधार अंकांची वाढ झाली आहे. मात्र व्याज, कर, घसारा आणि कर्जफेडपूर्व महसूल ४५ आधार अंकांनी घसरला आहे. कच्चा माल आणि विक्री यांच्यातील गुणोत्तर ३५५ आधार अंकांनी वाढले आहे.
कंपन्यांच्या विक्रीत होतेय वाढ; नफ्याच्या प्रमाणात मात्र घट; कोविड साथीमधून सावरत असल्याची चिन्हे
काही कंपन्यांनी विशेषत: बिगर जीवनावश्यक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांनी नफा टिकवून ठेवण्यासाठी किमतीत आवश्यक वाढ केली आहे. आगामी काळात मागणीत आणखी वाढ होईल, असे कंपन्यांना वाटते.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 06:25 AM2021-10-26T06:25:15+5:302021-10-26T06:25:37+5:30