Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाढता वाढता वाढे; गाठले नवीन उच्चांक

वाढता वाढता वाढे; गाठले नवीन उच्चांक

मुहूर्ताच्या सौद्यांना निर्देशांकांमध्ये घसरण झाली असली, तरी त्यानंतरचा सप्ताह मात्र बाजारात तेजीचा राहिला. परकीय वित्तसंस्था, तसेच स्थानिक गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याने बाजार वाढला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 02:46 AM2017-10-30T02:46:00+5:302017-10-30T02:46:14+5:30

मुहूर्ताच्या सौद्यांना निर्देशांकांमध्ये घसरण झाली असली, तरी त्यानंतरचा सप्ताह मात्र बाजारात तेजीचा राहिला. परकीय वित्तसंस्था, तसेच स्थानिक गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याने बाजार वाढला.

Increasingly Increasing; New Highs Achieved | वाढता वाढता वाढे; गाठले नवीन उच्चांक

वाढता वाढता वाढे; गाठले नवीन उच्चांक

प्रसाद गो. जोशी
मुहूर्ताच्या सौद्यांना निर्देशांकांमध्ये घसरण झाली असली, तरी त्यानंतरचा सप्ताह मात्र बाजारात तेजीचा राहिला. परकीय वित्तसंस्था, तसेच स्थानिक गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याने बाजार वाढला. मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील, तसेच राष्टÑीय शेअर बाजाराच्या निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी सप्ताहाच्या अखेरीस नवीन उच्चांक प्रस्थापित केला. केंद्र सरकारने केलेल्या गुंतवणुकीच्या घोषणा ऊर्जा देणाºया ठरल्या.
मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने या सप्ताहात प्रत्येक दिवशी वाढीव पातळी दाखविली. सप्ताहात बाजाराने प्रथमच ३३ हजार अंशांचा टप्पा ओलांडला. त्यानंतरही बाजार थांबला नाही. सप्ताहामध्ये ६५०.५० अंशांची भर घालून निर्देशांक ३३१५७.२२ अंशांवर बंद झाला. संवेदनशील निर्देशांकाने गाठलेला हा आजवरचा सर्वाधिक टप्पा आहे.
राष्टÑीय शेअर बाजारामध्येही सप्ताहभरात तेजी राहिली. सप्ताहाच्या अखेरीस या निर्देशांकाने नवीन उच्चांकी झेप घेतली. सप्ताहाच्या अखेरीस तो १७६.५० अंशांनी वाढून १०३२३.०५ अंशांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांच्यात अनुक्रमे २५७.९४ आणि २२२.२२ अंशांंनी वाढ होऊन ते १६३३४.३६, तसेच १७३०३.६६ अंशांवर बंद झाले.
केंद्र सरकारने बॅँकांना अधिक सक्षम करण्यासाठी २ लाख ११ हजार कोटी रुपयांचे भांडवल देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर देशामध्ये आगामी पाच वर्षांमध्ये ‘भारतमाला’ प्रकल्पांतर्गत ८३ हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याची घोषणा केली. यासाठी ६.९२ लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. या घोषणांनी बाजार उसळला.
भारताची अर्थव्यवस्था काहीशी स्थिर होत असल्याने व चांगला परतावा मिळत असल्याने, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आॅक्टोबर महिन्यामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये ३ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे. समभाग, रोखे आणि बाँड्स अशा स्वरूपातील ही खरेदी आहे.

देशातील नागरिकांकडून होणाºया घरगुती बचतीच्या दरामधील घट कायम राहिली असून, हा दर आता दोन दशकांमधील नीचांकी पातळीवर आलेला दिसून येतो. नागरिकांचा बचतीमधील बदलता कल हा प्रामुख्याने याला जबाबदार असल्याचे मानले जात आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशातील घरगुती बचतीचा दर खूपच रोडावला आहे. हा दर सन २०१६-१७ या वर्षामध्ये एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या १८.६ टक्के इतका खाली आला आहे. गेल्या दोन दशकांमधील हा नीचांक आहे. सन २०१५-१६ मध्ये हा दर १९.२ टक्के तर सन २००९-१० मध्ये बचतीचा दर सर्वाधिक म्हणजे २५.२ टक्के असा राहिलेला आहे.
नागरिकांकडून स्थावर मालमत्ता आणि सोन्यामध्ये होणारी गुंतवणूक आता अन्य गुंतवणूक प्रकारात बदलत असल्याने यामध्ये घट झाली आहे.

Web Title: Increasingly Increasing; New Highs Achieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.