Join us

वृद्धिदर दोन अंकी हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 3:46 AM

भारतीय अर्थव्यवस्था ५ हजार अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या श्रेणीत नेण्यासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा वार्षिक वृद्धिदर दोन अंकी करण्याची वेळ आता आली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था ५ हजार अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या श्रेणीत नेण्यासाठी सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा वार्षिक वृद्धिदर दोन अंकी करण्याची वेळ आता आली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जागतिक व्यापारातील भारताची हिस्सेदारी दुप्पट करून ३.४ टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य ठरविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, देश ‘अडकविणे, लटकावणे व भटकविणे’ संस्कृतीतून बाहेर आला आहे. जीएसटीमुळे व्यापार-उदीम सुगम झाला. करदात्यांची संख्याही वाढली आहे. ५४ लाख नव्या करदात्यांची नोंदणी झाली आहे. अप्रत्यक्ष करदात्यांची संख्या आता एक कोटीपेक्षा जास्त झाली आहे. जीएसटीच्या आधी ही संख्या ६० लाख होती.