Lokmat Money > बिझनेस न्यूज > १५ ऑगस्टला फक्त १,५७८ रुपयांत करा विमान प्रवास, कंपनीची फ्रीडम सेल ऑफर!

१५ ऑगस्टला फक्त १,५७८ रुपयांत करा विमान प्रवास, कंपनीची फ्रीडम सेल ऑफर!

Independence Day 2024 : स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत, विस्तारा एअरलाइन्सने फ्रीडम सेल सुरू केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 12:04 PM2024-08-14T12:04:09+5:302024-08-14T12:06:50+5:30

Independence Day 2024 : स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत, विस्तारा एअरलाइन्सने फ्रीडम सेल सुरू केला आहे.

Independence Day 2024 : Vistara announces special sale with flight tickets starting at ₹1,578  | १५ ऑगस्टला फक्त १,५७८ रुपयांत करा विमान प्रवास, कंपनीची फ्रीडम सेल ऑफर!

१५ ऑगस्टला फक्त १,५७८ रुपयांत करा विमान प्रवास, कंपनीची फ्रीडम सेल ऑफर!

Independence Day 2024 : नवी दिल्ली : विमान प्रवास करण्याऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. तुम्हीही एखाद्या शहरात विमानानं प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. १५ ऑगस्ट हा प्रवास करण्याची उत्तम संधी आहे. कारण, १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्टपर्यंत मोठा वीकेंड येत आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक दिवस सुट्टी घेऊन प्रवास करण्याची संधी मिळू शकते.

रक्षाबंधन ते दिवाळीपर्यंत तुम्ही स्वस्त विमान तिकीट शोधत असाल तर टाटा समूहाची एअरलाइन्स विस्तारा तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत, विस्तारा एअरलाइन्सने फ्रीडम सेल सुरू केला आहे. या ऑफरमध्ये तुम्ही ३१ ऑक्टोबरपर्यंत स्वस्त विमान तिकीट बुक करू शकता. ही ऑफर प्रवाशांसाठी १५ ऑगस्टपर्यंत वैध आहे.

विस्तारा एअरलाइन्सनं सोशल मीडियाद्वारे सांगितलं की, एअरलाइन्सच्या फ्रीडम सेलमध्ये फक्त १,५७८ रुपयांमध्ये हवाई प्रवास करता येईल. ही ऑफर एअरलाइन्सच्या तिन्ही क्लाससाठी (इकॉनॉमी, प्रीमियम इकॉनॉमी आणि बिझनेस क्लास) लागू आहे. ज्यामध्ये प्रवासी ३१ ऑक्टोबर २०१४ पर्यंत फ्लाइट बुक करू शकतात.

विस्ताराच्या फेस्टिव्ह सेलमध्ये प्रवाशांना इकॉनॉमी, प्रीमियम इकॉनॉमी आणि बिझनेस क्लास या तिन्ही क्लासमध्ये ऑफर मिळत आहेत. देशांतर्गत प्रवाशांसाठी इकॉनॉमी क्लासमध्ये १,५७८ रुपये, प्रीमियम इकॉनॉमी क्लासमध्ये २,६७८ रुपये आणि बिझनेस क्लासमध्ये ९,९७८ रुपयांपासून भाडे सुरू होत आहे.

याचबरोबर, ही ऑफर विस्ताराच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइटवर देखील उपलब्ध आहे. प्रवाशांना इकॉनॉमी क्लास (दिल्ली-काठमांडू) ११,९७८ रुपये, प्रीमियम इकॉनॉमी क्लास (दिल्ली-काठमांडू) १३,९७८ रुपये आणि बिझनेस क्लास (दिल्ली-काठमांडू) ४६,९७८ रुपयांपासून भाडे सुरु होत आहे.

कधी बुक करू शकता?
विस्तारा एअरलाइन्सच्या अधिकृत वेबसाइटनुसार, प्रवाशांसाठी ही फ्रीडम सेल ऑफर १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत फ्लाइट तिकीट बुक करू शकता.

Web Title: Independence Day 2024 : Vistara announces special sale with flight tickets starting at ₹1,578 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.